Join us  

 राम गोपाल वर्मांचे मुंबईला अलविदा, या ठिकाणी झालेत शिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 5:17 PM

सिनेमांपेक्षा वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत राहणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आता मुंबई सोडून दुस-या ठिकाणी स्थायिक झाले आहेत.

ठळक मुद्देदिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे चित्रपटही वाद ओढवून घेतात.

अनेक सुपरहिट सिनेमे देणारे आणि बहुतांशवेळी सिनेमांपेक्षा वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत राहणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आता मुंबई सोडून दुस-या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. होय, कुठे तर दूर गोव्यात. अर्थात मुंबई सोडून वर्मा यांनी गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी अचानक घेतला नाही तर हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे.

ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले. ‘मी सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करतोय. त्यासाठी गोवा एक योग्य ठिकाण आहे. लॉकडाऊनच्या काळात मी दीर्घकाळ हैदराबादेत मुक्कामाला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून मी मुंबईबाहेर गोव्यात शिफ्ट झालोय. कोरोना व्हायरस व लॉकडाऊनने अनेक गोष्टी बदलल्या. आता संपर्काच्या नव्या साधनांशी सर्वांनी जुळवून घेतले ओ. पर्सनल मीटिंग्स आता कदाचित बाद झाल्यात. प्रत्येकजण आॅनलाईन मीटिंग्स वा चॅटवर बोलतो. त्यामुळे कुठेही राहिले तरी फार बिघडणारे नाही. मुंबईत कामानिमित्त मी येत जात राहिन,’असे त्यांनी सांगितले.

राम गोपाल वर्मा लवकरच ‘12 व क्लॉक’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमा मिथुन चक्रवर्ती, फ्लोरा सैनी, मानव कौल मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय येत्या काळात त्यांच्या काही वेबसीरिजही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे चित्रपटही वाद ओढवून घेतात. राम गोपाल वर्मा यांनी सन १९८९ मध्ये नागार्जुन स्टारर ‘शिवा’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये सत्या, कंपनी, सरकार यासारखे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. 

टॅग्स :राम गोपाल वर्मा