Join us  

Rakhi Sawant : “अगं, किती ड्रामा करशील...”, राखी सावंतचा ‘तो’ रडका व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:47 PM

Rakhi Sawant : आदिल कोठडीत गेल्यानंतरही राखीचे आरोप आणि ड्रामा संपता संपत नाहीये. राखीचे ढसाढसा रडतानाचे, रडत रडत बेशुद्ध पडतानाचे एक ना अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आता तिचा एक नवा व्हिडीओही समोर आला आहे.

राखी सावंत सध्या नुसती रडतेय. अगदी भररस्त्यात कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडताना दिसतेय. राखीने पती आदिलवर फसवणूक आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला. पाठोपाठ पोलिसात तक्रारही केली. राखीच्या आरोपांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पण आदिल कोठडीत गेल्यानंतरही राखीचे आरोप आणि ड्रामा संपता संपत नाहीये. राखीचे ढसाढसा रडतानाचे, रडत रडत बेशुद्ध पडतानाचे एक ना अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. आता तिचा एक नवा व्हिडीओही समोर आला आहे आणि हा व्हिडीओ पाहून लोकांनी राखीला जबरदस्त ट्रोल करायला सुरूवात केलीये. ‘मेरे साथ खुदा खडा है..., मुझे छोड दो... वो बाहर आकर शादी करने वाला है...,’ असं व्हिडीओत राखी म्हणताना दिसतेय. रडत रडत अचानक तिचा मागे तोल जातो, पण तिच्यासोबतची तिची मैत्रिण तिला सांभाळते. राखीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

राखी ड्रामा थांबत, बघ तुझ्यासोबतची तुझी मैत्रिणही हसतेय, असं एका युजरने लिहिलंय. आता तर स्वप्नातही हीच येतेय. हिचा ड्रामा पाहून पाहू थकलोय, असं एका युजरने कमेंटमध्ये म्हटलंय.  काम मिळत नसल्याने ही रस्त्यावर असा ड्रामा करत फिरतेय,’  ‘अरे कोणीतरी हिला आवरा’, अशा कमेंटही कमेंट बॉक्समध्ये पडल्या आहेत. ‘तुझ्यासोबत काही चुकीचं झालंय तर न्यायालयावर विश्वास ठेव, मीडियासमोर रडून काय होणार?’ असं एका युजरने म्हटलं आहे. अगं तुला या ड्राम्याचा कंटाळा येत नाही का? मेरे साथ खुदा खडा है, म्हणतेय. एका क्षणात तू मुस्लिम होतेस, दुसऱ्या क्षणाला हिंदू अन् ख्रिश्चन..., अशी कमेंट एका युजरने केली आहे. हिचे व्हिडीओ दाखवणं बंद करा, अशी मागणीही एका युजरने केली आहे.

आठ महिन्यांआधी राखी सावंतने  आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केलं. यासाठी तिने मुस्लिम धर्म स्वीकारला. अगदी फातिमा हे नवं नावही धारण केलं. मात्र आदिलच्या अफेअरबद्दल कळताच तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचं अफेअर आहे, त्याने मला मारहाण केली, माझे पैसे घेतले, असे तिचे आरोप आहेत.

टॅग्स :राखी सावंत