Join us  

पुन्हा एकदा ट्रोल झाली राखी सावंत, जुना फोटो पाहून चाहत्यांचा होतोय संताप, काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 11:32 AM

वाद्रगस्त फोटोंमुळे राखी सावंतला जबरदस्त टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी तिने स्पष्टीकरत देत म्हटले होते की, सिनेमाच्या शूटिंगवेळचा हा फोटो आहे.

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, आयटम गर्ल, एक अशी व्यक्ती जिच्यासाठी चर्चेत राहणं काहीच अवघड नाही, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. ती कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. राखीच्या खासगी आयुष्याबद्दलही कायम चर्चा असते. नुकतंच एक फोटो व्हायरल झाला आहे. राखीचा हा फोटो आत्ताचा नसून जुना फोटो आहे.

 

२०१९ मध्ये पाकिस्तानचा झेंडा हातात घेतलेल्या फोटोमुळे वादात आली होती. याच वादग्रस्त फोटोमुळे राखी  पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. हा फोटो सध्या व्हायरल होत असून यावर पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. या फोटोमुळे तिच्यावर पुन्हा एकदा टीका होत आहे. 

प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटी काय करतील याचा नेम नाही. कधी कधी काही सेलिब्रिटींचे फोटो किंवा वागणं पाहून प्रसिद्धीसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे आपण गेल्या काही वर्षात अनुभवलं आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियावर वारंवार असे सेलिब्रिटींचे प्रसिद्धीचे स्टंट पाहायला मिळतात. असेच वादग्रस्त स्टंट करत राखी नेहमीच चर्चेत असते. मात्र या फोटोंमुळे राखीला जबरदस्त टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी तिने स्पष्टीकरत देत म्हटले होते की, सिनेमाच्या शूटिंगवेळचा हा फोटो आहे. 

सिनेमात  पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारत असल्याचे तिने सांगत सारवा सारव करण्याचाही प्रयत्न केला होता. तर राखीच्या स्पष्टीकरणावर काहीनी आक्षेप घेत म्हटल होते की,पाकिस्तान इस्लाम धर्म मानतो. इस्लाम शांततेचा धर्म आहे. कोणत्याही महिलेला अशाप्रकारे अंगप्रदर्शन करण्याची परवानगी इस्लाम देत नाही. यावरही राखीने संताप व्यक्त करत कमेंट करणा-या व्यक्तींना खडेबोल सुनावले होते.

राखी सावंतचा दावा; स्वप्नात आला सुशांत सिंग राजपूत अन् म्हणाला, 'तुझ्या पोटी घेईन पुनर्जन्म!'

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच राखी सावंतने एक दावा करून सर्वांनाच धक्का दिला होता. सुशांत सिंह राजपूत पुनर्जन्म घेईल आणि त्याचा जन्म माझ्याच पोटातून होईल, असा दावा राखी सावंतने केला होता. राखी सावंतने इन्स्टाग्रामवर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर करत म्हटले होते की, सुशांत सिंह राजपूत रात्री तिच्या स्वप्नात आला आणि त्याने पुन्हा जन्म घेणार असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :राखी सावंत