Join us  

मला ट्रोल कराल तर याच अवॉर्डने मारेल...! राखी सावंत भडकली!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 1:50 PM

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या जाम भडकलीय. होय, अलीकडे राखीला दादासाहेब फाळके फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेस्ट आयटम डान्सर म्हणून तिला या पुरस्काराने गौरविण्यात आले. पण राखीला हा अवार्ड मिळाला आणि लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

ठळक मुद्देआगामी चित्रपटात पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारणा-या राखीने यावरून ट्रोल करणा-यांनाही सडेतोड उत्तर दिले.

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या जाम भडकलीय. होय, अलीकडे राखीला दादासाहेब फाळके फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेस्ट आयटम डान्सर म्हणून तिला या पुरस्काराने गौरविण्यात आले. पण राखीला हा अवार्ड मिळाला आणि लोकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले. मग काय, राखी जाम भडकली. मला ट्रोल कराल तर या अवार्डने बदडेल, अशी धमकीच तिने ट्रोलर्सला दिली.राखीच्या हातात पुरस्कार पाहून अनेकांनी तिला ट्रोल करणे सुुरु केले. हा अवार्ड कितीला खरेदी केला? असा प्रश्न एका युजरने दिला विचारला. ‘इंडस्ट्रीला वेड लागलेय, तेव्हाच तुला हा पुरस्कार मिळाला,’ असे अन्य एकाने लिहिले. खरे तर याआधीही राखी अनेकदा ट्रोल झालीय. पण तिने ते फारसे मनावर घेतले नाही. पण यावेळी मात्र तिला पारा चढला आणि ट्रोल करणाºयांना तिने चांगलेच सुनावले.

‘देवाचे आभार. आता आयटम गर्ल्सलाही अवार्ड मिळू लागलेत. मी माझ्या आयुष्यात १०० आयटम साँग केलेत. तेही अनेक भाषेतले. पण आजपर्यंत कधीही मला पुरस्कार मिळाला नाही. माझे सर्व शो हिट झालेत. पण कधी कोणताच पुरस्कार मला दिला गेला नाही. पायाची हाडे तुटायला झाली तेव्हा कुठे मला हा पुरस्कार मिळाला. माझी इतकी लायकी नाही की, मी पुरस्कार खरेदी करू शकेल. मी १२ वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. माझे इतके गाणे हिट आहेत. पण मला एकही पुरस्कार मिळाला नाही, हा विचार करून मला पुरस्कार देण्यात आला,’असे राखी म्हणाली.

आगामी चित्रपटात पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारणा-या राखीने यावरून ट्रोल करणा-यांनाही सडेतोड उत्तर दिले. चित्रपटात  पाकिस्तानी बनलेल्या मुलीच्या हातात पाकचा झेंडा नसेल तर काय भारताचा असेल काय? असा सवाल तिने केला. यावरून ट्रोल करणाºयांना तिने चांगलीच तंबी दिली. मला ट्रोल करू नका. माझी खोपडी खराब करू नका. नाहीतर याच अवार्डने मारेल, असे सरतेशेवटी ती म्हणाली. 

टॅग्स :राखी सावंत