Join us
Daily Top 2Weekly Top 5

घासाघीस करत आंबे खरेदी करताना दिसली राखी सावंत, नेटिझन्सने विचारले गरिबांना लुटणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 12:36 IST

एवढेच नव्हे तर आंबे विक्रेत्याशी बोलताना राखी तिच्या तोंडावरचा मास्क सतत काढताना दिसत आहे. यावरून देखील नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरले आहे.

ठळक मुद्देराखीच्या या व्हिडिओत आंबे विकणाऱ्या विक्रेत्याला राखी आंबे कितीचे दिले असे विचारताना दिसत आहेत.

राखी सावंत पब्लिसिटीसाठी काहीही करू शकते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आता राखी चक्क आंब्याच्या दुकानात खरेदीला गेली असून तिथे ती बार्गेनिंग करताना दिसत आहे. राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून गरिबांना लुटणार का असा प्रश्न नेटिझन्स तिला विचारत आहेत. एवढेच नव्हे सार्वजनिक ठिकाणी तिने मास्क घातला नसल्याने तिला चांगलेच सुनावत आहेत.

राखीच्या या व्हिडिओत आंबे विकणाऱ्या विक्रेत्याला राखी आंबे कितीचे दिले असे विचारताना दिसत आहेत. त्यावर आठशे असे त्याने उत्तर दिल्यावर चारशेत दे... असे ती सांगत आहे. एवढेच नव्हे तर पाऊस पडला तर त्याच्यावर कीड पडेल कोणी खाणार नाही... त्यापेक्षा मी खाल्ले तर तुला आशीर्वाद मिळतील असे सांगताना राखी दिसत आहे. 

राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स तिला चांगलेच सुनावत आहेत. आंबे विक्रेत्याशी बोलताना राखी तिच्या तोंडावरचा मास्क सतत काढताना दिसत आहे. यावरून नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच ती आंबे घेताना घासाघीस करताना पाहून मॉलमध्ये गेल्यावर देखील असेच करतेस का असे एकाने विचारले आहे तर एकाने गरिबांना लुटणार का असा प्रश्न तिला विचारला आहे. ही बाहेरच्या जगात देखील बिग बॉसच्या घराप्रमाणेच वागते असे देखील एकाने म्हटले आहे. 

टॅग्स :राखी सावंत