Join us

​राखी सावंत जाणार का तुरुंगात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 15:16 IST

महर्षी वाल्मिकींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाºया राखी सावंतला तुरुंगात जावे लागू शकते. होय, पंजाबातील लुधियाना न्यायालयाने राखीचा अटकपूर्व जामीन फेटाळत, ...

महर्षी वाल्मिकींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाºया राखी सावंतला तुरुंगात जावे लागू शकते. होय, पंजाबातील लुधियाना न्यायालयाने राखीचा अटकपूर्व जामीन फेटाळत, तिच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केला आहे. म्हणजेच, तिच्या अटकेचे आदेशही दिले आहेत.   या प्रकरणी पुढील सुनावणी ५ सप्टेंबरला होणार आहे.जिल्हा सत्र न्यायालयानें गत ५ आॅगस्टला राखीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. शिवाय ७ आॅगस्टला म्हणजे काल राखीने न्यायालयात शरण यावे असे म्हटले होते. पण काल  राखी न्यायालयापुढे हजर झाली नाही. राखी अमेरिकेत असल्याचे तिच्या वकीलांनी सांगितले. जामिन वाढवून देण्याची विनंतीही तिच्या वकीलांनी केली. पण न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावत राखी विरोधात अटक वॉरंट जारी केला.  एका मुलाखतीमध्ये राखीने वाल्मिकींचा उल्लेख 'मारेकरी' म्हणून केला होता. महर्षी वाल्मिकी व गायक मिका सिंह यांची तुलना राखीने केली होती. राखी सावंतच्या वक्तव्याने वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा करत, वकील नरिंदर आदित्य यांनी ९ जुलै २०१६ रोजी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. राखीने वाल्मिकी समाजाची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती. अर्थात ‘मला कोणाच्याही भावनांना दुखवायच्या नव्हत्या. कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास त्यांची माफी मागते,’ असे राखीने म्हटले होते.एकंदर राखी या प्रकरणामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात कुणाचाच पाठींबा मिळत नसल्याबद्दल राखी दु:खी आहे. गतवर्षी मी मिकाला पाठींबा देण्यासाठी पत्रपरिषद घेतली होती.पण आज मी अडचणीत आहे तर मिकाने याबद्दल मला एका शब्दाने विचारले देखील नाही. मिकासारख्या लोकांच्या वागण्याने मी दु:खी आहे, असे तिने म्हटले आहे.