Join us  

राजपाल यादवची राजकारणात उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 10:13 PM

उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहत असताना कॉमेडीचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजपाल यादवला आता राजकारणाचे मैदान खुणावत असल्याचे दिसतेय. ...

उत्तर प्रदेशात निवडणुकीचे वारे वाहत असताना कॉमेडीचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजपाल यादवला आता राजकारणाचे मैदान खुणावत असल्याचे दिसतेय. त्याने लखनौ येथे ‘सर्व समभाव पार्टी’(एसएसपी) हा नवा राजकीय पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा केली. आम्ही लोकांशी बोलून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे त्याने सांगितले. नवीन पक्षाची घोषणा करीत असताना राजपाल म्हणाला, ‘मला राजकाराणात येऊन लोकांची सेवा करायची आहे. आमचा पक्ष निवडणूक लढविणारच आहे. पण आमची निवडणुकीची रणनीती वेगळी असेल. राजकारण कसे केले जाते ते आम्ही समाजाला व अन्य राजकारण्यांना शिकविणार आहोत. लोकांना मजबूत केले तरच लोकशाही मजबूत होते ते याचा आदर्श आम्ही ठेवणार आहोत. एका राजकीय पक्षाचे स्वप्न घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे.आमचा पक्ष सत्ता, स्वार्थ यांच्यासाठी नसून तो सर्वसामान्य लोकांसाठी आहे. लोकांच्या सेवेसाठी आम्ही कोणत्याही वेळी तयार असू. एसएसपी हा निवडणुकीच्या काळात बाहेर येणाºया बेडकासारखा नाही. निवडणूक  असल्याने या काळात आपल्या भावाना लोकांपर्यंत पोहचविता येतात असेही तो म्हणाला. आंदोलन फॅशन नाही. तसे करणाºयांत आमचा समावेश करू नये. आम्ही लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर सोेडविण्यावर आमचा भर आहे असे त्याने आवर्जून सांगितले. राजपाल यादवने कॉमेडी कलावंत म्हनून स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. राजपालचा चाहता वर्गही मोठा आहे. विशेष म्हणजे त्याच्या गृह राज्यात त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळते. राजपालच्या या आव्हानाला साद देत नव्या दमाचे नेतृत्व उदयास आले तर दक्षिणेत असणार अभिनेता ते नेता हा ट्रेंड उत्तर भारतात आणण्याचे श्रेय त्याला मिळेल.