Join us  

 ‘या’ अभिनेत्याकडे कधीकाळी नव्हते जेवायचे पैसे, दोन वर्षे शिक्षकाने भरली शाळेची फी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 8:00 AM

आज केवळ एका चित्रपटासाठी कोट्यावधी रूपये घेणारा हा अभिनेता एकेकाळी पै-पैला मोताद होता.

ठळक मुद्देराजकुमारच्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटात परेश रावल, सुमित व्यास, बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

अभिनेता राजकुमार राव सध्या ‘मेड इन चायना’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात राजकुमार अभिनेत्री मौनी रायसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. सध्या राजकुमार व मौनी दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये राजकुमार व मौनीने रिअल लाईफबद्दल असे काही खुलासे केलेत की सगळेच थक्क झालेत.  यावेळी राजकुमारने आपल्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल सांगितले. आज केवळ एका चित्रपटासाठी कोट्यावधी रूपये घेणारा राजकुमार एकेकाळी पै-पैला मोताद होता. एकेकाळी शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते. अशात एका शिक्षकाने दोन वर्षे राजकुमारची फी भरली होती.  

मुंबईत आल्यानंतर राजकुमार सात हजार रूपये देऊन रूम शेअर करून राहिला. त्याने सांगितले की, मी मुंबईत आलो तेव्हा एका छोट्याशा खोलीत राहिलो. आम्ही रूम शेअर करायचो. महिन्याचा खर्च जवळपास 15 ते 20 हजार रूपये होता. मला आठवते, एका महिन्यात माझ्या खिशात 18 रूपये होते आणि माझ्या पार्टनरकडे 23 रूपये होते. ना खाण्यासाठी पैसे, ना ऑडिशनसाठी चांगले कपडे असे ते दिवस होते.  मी व माझा मित्र बाईकवरून ऑडिशनसाठी जायचो. धुळीने अख्खा चेहरा माखलेला असायचा. आम्ही गुलाबपाण्याने चेहरा स्वच्छ करायचो आणि ऑडिशन द्यायचो.

मुंबईत कामाच्या शोधात आलेल्या राजकुमारला त्याकाळी काही लहान-मोठया जाहिराती मिळाल्या. त्याकाळात अनेकदा खाण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे. अशावेळी मित्रांना फोन करून जेवणाची व्यवस्था करायचा. मित्रांच्या भरवशावर राजकुमारने अनेक रात्री काढल्या.  

रोज वेगवेगळ्या कास्टिंग डायरेक्टर्सला भेटायचे आणि त्यांना काम मागायचे, असे सुमारे वर्षभर केल्यानंतर एकदिवस राजकुमारची नजर एका जाहिरातीवर गेली. दिवाकर बॅनर्जी यांना आपल्या चित्रपटासाठी एक नवा चेहरा हवा होता, अशी ही जाहिरात होती. याच जाहिरातीने राजकुमारचे नशिब फळफळले. राजकुमारने यासाठी ऑडिशन दिले आणि राजकुमारला  लव्ह, सेक्स और धोखा हा पहिला चित्रपट मिळाला.  

राजकुमारच्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटात परेश रावल, सुमित व्यास, बोमन इराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 25 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  

टॅग्स :राजकुमार राव