Join us  

राजकुमार रावच्या नव्या बाईकची किंमत ऐकून येईल तुम्हाला भोवळ, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 3:56 PM

राजकुमारने हार्ले डेविडसन फॅट बॉब बाईक खरेदी केली आहे

सिटीलाईट्स, शादी में जरूर आना, न्यूटन, स्त्री असे शानदार चित्रपट देणारा अभिनेता राजकुमार राव याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली. राजकुमार राव नेहमीच बाईकवर राईड करताना दिसत असतो. नुकतीच राजकुमारने  हार्ले डेविडसन फॅट बॉब (Harley Davidson Fat Bob) बाईकची खरेदी केली आहे  या बाईकची शोरुम मधील किंमत 14.69 लाख आहे. 2017मध्ये ही बाईक लाँच करण्यात आली आहे. 

या बाईकच्या पहिल्या व्हर्जनच्या तुलनेत या व्हर्जनमध्ये अनेक बदल कंपनीने केले आहेत. ही बाईक खूपच अग्रेसिव्ह आहे. याशिवाय बाईकच्या इंजिनमधेही अनेक बदल करण्यात आले आहेत. 34 स्टिफर 1745 सीसीचं इंजिन आहे 3250 RPM वर 145Nm चा टॉर्क जेनेरेट करतं. तसेच या बाइकचा वेग 180Kmph एवढा आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, रूहअफ्जा सिनेमात दिसणार. दिशेन विजान निर्मित या हॉरर-कॉमेडी चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. जान्हवी आणि राजकुमार यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग रूरकी, मनाली आणि आग्रा येथे करण्यात आली आहे.

या चित्रपटात वरूण शर्मा, पंकज त्रिपाठी, अम्मा शरीफ आणि रोनित रॉय हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २० मार्च रोजी चित्रपट रिलीज होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर पाहूण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :राजकुमार रावहार्ले डेव्हिडसन