Join us  

पुन्हा येणार ‘स्त्री’! राजकुमार राव व श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा येणार सीक्वल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 11:15 AM

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट गत शुक्रवारी रिलीज झाला. रिलीजच्या दोन दिवसांत या चित्रपटाने १७ कोटींवर गल्ला जमवला. 

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट गत शुक्रवारी रिलीज झाला. रिलीजच्या दोन दिवसांत या चित्रपटाने १७ कोटींवर गल्ला जमवला. पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाचे कलेक्शन ३० कोटींवर जाईल, अशी शक्यता आहे. असे झालेच तर २५ कोटी बजेट असलेला हा चित्रपट हिटच्या यादीत जावून बसणार आहे, तूर्तास आम्ही ‘स्त्री’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. होय, ही ‘स्त्री’ लवकरचं पुन्हा एकदा तुमच्या भेटीस येणार आहे. होय, म्हणजेच या चित्रपटाचा सीक्वल येणार आहे. ‘स्त्री’चे निर्माते दिनेश विजान यांनी याबाबतचा खुलासा केला़ ‘स्त्री’चे शेवटचे दोन सीन्स हे सीक्वलची तयारीचं दर्शवतात. म्हणजेच, या चित्रपटाचा सीक्वल येणार हे जणू ठरलेलेच होते. तुम्ही ‘स्त्री’ पाहिला असेल तर कळेल की, या चित्रपटाला ‘ओपन एन्डिंग’ आहे. आम्ही फ्रॅन्चाईजी डोळ्यापुढे ठेवूनचं हा चित्रपट साकारला आहे. सीक्वल श्रद्धाची कहाणी आणि अशाच काही प्रश्नांची उत्तर देणारा असेल. पुढील वर्षाच्या अखेरिसपर्यंत या चित्रपटाच्या सीक्वलचे शूटींग सुरू होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर याची कथा कर्नाटकातील ९० च्या दशकात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. कर्नाटकच्या एका गावात रात्री एका स्त्रीचे भूत फिरायचे. हे भूत रात्री लोकांच्या घराचा दरवाजा ठोठवायची आणि जो कुणी दरवाजा उघडायचा, त्याचा मृत्यू व्हायचा. यानंतर या भूतापासून वाचण्यासाठी लोकांनी आपल्या घराच्या भिंतींवर ‘कल आना’ असे लिहिणे सुरू केले.   याच गावात  विकी नामक एक तरूण मित्र बिट्टू  आणि जना या मित्रांसोबत  राहत असतो. आजूबाजूच्या गावात लेडीज टेलर म्हणून तो प्रसिद्ध असतो. गावातले सगळे लोक चेटकिणीला घाबरतात. पण विकीला मात्र या गोष्टीवर जराही विश्वास नसतो. याचदरम्यान एक अनामिक सुंदर मुलीसोबत  त्याची मैत्री होते आणि दुसरीकडे विकी आणि बिट्टूचा मित्र जना याला स्त्री नावाची चेटकीण आपले लक्ष्य बनवते. इथून पुढे चित्रपटाची कथा एक अनपेक्षित वळण घेते.

टॅग्स :राजकुमार राव