Join us  

अजय देवगणसोबत सिनेमात दिसणार राजकुमार राव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 4:24 PM

राजकुमार राव सध्या यशाच्या शिखरावर आहे. गेल्या आठवड्यात त्याचा रिलीज झालेल्या स्त्री सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सहा दिवसांत सिनेमाने 50 कोटींचा बिझनेस केला.  

ठळक मुद्दे राजकुमार राव आता अजय देवगणसोबत दिसण्याची शक्यता आहेहंसल मेहता या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे

राजकुमार राव सध्या यशाच्या शिखरावर आहे. गेल्या आठवड्यात त्याचा रिलीज झालेल्या स्त्री सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सहा दिवसांत सिनेमाने 50 कोटींचा बिझनेस केला.  

मिड-डेच्या रिपोर्टनुसार राजकुमार राव आता अजय देवगणसोबत दिसण्याची शक्यता आहे. यासिनेमाचे दिग्दर्शन हंसल मेहता करणार आहेत आणि अजय देवगण या सिनेमाची निर्मिती करणार आहे. रिपोर्टनुसार हंसल मेहता यांना 'स्त्री' राजकुमारचे कॉमिक टाइमिंग आवडले आहे.  स्त्री पहिल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला होता की राजकुमारला घेऊन ते कॉमेडी सिनेमा तयार करणार.  राजकुमार रावला हा सिनेमामुळे त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगच्या शेड्यूलमध्ये बदल करावे लागणार आहेत.  राजकुमार लवकरच कंगना राणौतसोबत 'मेंटल है क्या' सिनेमात दिसणार आहे. 

अजय देवगणच्या नेमक्या कोणत्या सिनेमात राजकुमार राव दिसणार आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. अजय  ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ सिनेमाची निर्माती अजय देवगण करतो. अजयने या सिनेमासाठी खूप तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजयसोबत या सिनेमात सैफ अली खानचे देखील नाव कन्फर्म करण्यात आले होते. मात्र त्याच आता तेलुगु सुपरस्टार जगपती बाबूला कन्फर्म करण्यात आले आहे. मुंबईतल्या स्टुडिओमध्ये तानाजीचे शूटिंग सुरु आहे त्याठिकाणी जगपती बाबू स्पॉट झाला आहे. या सिनेमात तो नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे याबाबतची माहिती अजून मिळू शकलेली नाही. 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार अजय देवगण या सिनेमाचे शूटिंग ऑक्टोबरपासून सुरु करणार आहे. यासिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत करतोय. अजय देवगण यात तानाजींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे बजेच जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे.

टॅग्स :राजकुमार रावअजय देवगण