Join us  

राजीव कपूर यांची या कारणामुळे होणार नाही प्रार्थना सभा, नितू कपूर यांनी दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 2:14 PM

राजीव कपूर यांच्यावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण आता त्यांचा चौथ्या दिवशी केला जाणारा विधी केला जाणार नसल्याची माहिती राजीव यांची वहिनी नीतू सिंग कपूर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनितू यांनी लिहिले आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहाता राजीव कपूर यांचा चौथ्या दिवशी करण्यात येणारा विधी करण्यात येणार नाही. चौथ्याला अनेक लोक उपस्थित राहात असल्याने हा विधी न करण्याचे त्यांनी ठरवले आहे. 

ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनामुळे चांगलाच धक्का बसला आहे. राजीव सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होते. त्यांनी सकाळचा नाश्ता केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि त्यातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला.

राजीव कपूर यांच्यावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण आता त्यांचा चौथ्या दिवशी केला जाणारा विधी केला जाणार नसल्याची माहिती राजीव यांची वहिनी नीतू सिंग कपूर यांनी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात लिहिले आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहाता राजीव कपूर यांचा चौथ्या दिवशी करण्यात येणारा विधी करण्यात येणार नाही. चौथ्याला अनेक लोक उपस्थित राहात असल्याने हा विधी न करण्याचे त्यांनी ठरवले आहे. 

गेल्या वर्षभरात कपूर कुटुंबावर हा तिसरा मोठा आघात आहे. ऋषी कपूर यांचे निधन एप्रिल महिन्यात झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते. या दु:खातून कपूर कुटुंब सावरत असतानाच राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली. गेल्यावर्षी ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले होते. दोन वर्षापासून कॅन्सरशी झुंज सुरू असतानाच ३० एप्रिल २०२० रोजी ऋषी कपूर हे जग सोडून गेले होते. त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबासह बॉलिवूड शोकसागरात बुडाले होते. 

टॅग्स :राजीव कपूरनितू सिंग