Join us  

चक्क क्रिकेट खेळताना दिसले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 1:03 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रजनीकांत चक्क क्रिकेट खेळताना दिसत असून ते बॅटिंग करत आहेत.

ठळक मुद्देया फोटोंमध्ये रजनीकांत आपल्याला बॅटिंग करताना दिसत आहेत. तसेच या फोटोत त्यांच्यासोबत या चित्रपटातील अभिनेत्री नयनतारा आणि चित्रपटातील क्रू मेंबर देखील पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये रजनीकांत यांचा मुड खूपच चांगला असल्याचे दिसून येत आहे. 

रजनीकांत हे दाक्षिणात्य सुपरस्टार असून दक्षिणेतील राज्यांमध्ये त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेतात. तिथले लोक देव समजून त्यांची पूजादेखील करतात. त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याआधी अनेकवेळा त्यांच्या पोस्टर्सना दुधाचा अभिषेकदेखील केला जातो. रजनीकांत यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. त्यांचे फॅन्स केवळ भारतात नव्हे तर जगभर आहेत. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हम, चालबाज यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. रजनीकांत यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी त्यांचे चाहते आतुर असतात.  

रजनीकांत यांना दरबार या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मुंबईच्या रस्त्यांवर काही दिवसांपूर्वी पाहाण्यात आले होते आणि आता या चित्रपटाच्या सेटवरचे आणखी काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रजनीकांत चक्क क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रजनीकांत आपल्याला बॅटिंग करताना दिसत आहेत. तसेच या फोटोत त्यांच्यासोबत या चित्रपटातील अभिनेत्री नयनतारा आणि चित्रपटातील क्रू मेंबर देखील पाहायला मिळत आहेत. या फोटोंमध्ये रजनीकांत यांचा मुड खूपच चांगला असल्याचे दिसून येत आहे. 

दरबार या चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण सुरू असताना लीक झालेल्या फोटोवरून त्यांचा या चित्रपटातील लुक कसा असणार हे कळून आला होता. या चित्रपटातील एका भूमिकेसाठी ते केसांचा टोप लावणार नसल्याचे या फोटोंवरून दिसून आले होते. 

 

दरबार या चित्रपटात रजनीकांत दुहेरी भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत ते दिसणार असून या पोलिसाच्या मुलाची भूमिका देखील तेच साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. आता व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये रजनीकांत यांच्या डोक्यावर टोप दिसत असून हा त्यांचा चित्रपटातील दुसरा लुक असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दरबार या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरुगादॉस करणार असून या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नयनतारा, निवेदा थॉमस, रवी किशन, कुणाल खेमु, सौरभ शुक्ला या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

टॅग्स :रजनीकांत