‘या’ कारणामुळे रजनीकांतने रद्द केला श्रीलंका दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 19:08 IST
एका आवास योजनेच्या उद्घाटनासाठी श्रीलंका दौºयावर जाणाºया दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आला तामिळ संघटनांच्या तीव्र विरोधांमुळे आपला दौरा रद्द करावा ...
‘या’ कारणामुळे रजनीकांतने रद्द केला श्रीलंका दौरा
एका आवास योजनेच्या उद्घाटनासाठी श्रीलंका दौºयावर जाणाºया दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आला तामिळ संघटनांच्या तीव्र विरोधांमुळे आपला दौरा रद्द करावा लागला. एका न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत याला दौºयाबाबत पुन्हा एकदा विचार करण्याचा तामिळ संघटनांनी सल्ला दिला होता. रजनीकांत संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दौरा रद्द केला. याबाबत रजनीकांतने एका पत्रकाद्वारे केलेल्या खुलाशानुसार, मी तामिळ संघटनांच्या सल्ल्यानुसारच दौरा रद्द केला आहे. त्यांनी मला विनम्रतापूर्वक दौरा रद्द करण्यास सांगितले होते. वास्तविक मला कोणी सल्ला दिला तर लगेचच मी त्यास होकार देत नाही. परंतु मी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला असल्याचे त्याने स्पष्ट केले. येत्या ९ एप्रिल रोजी रजनीकांत दोन दिवसीय श्रीलंका दौºयावर जाणार होता. याठिकाणी तो १५० पेक्षा अधिक विस्थापित तामिळी लोकांच्या घरकुलांचे उद्घाटन करणार होता. लिबरेशन पॅँथर पार्टी म्हणजेच विदुथालाई तिरुथैगल काचीच्या (वीसीके) कार्यकर्त्यांनी रजनीकांतला सल्ला दिला होता की, जर तो याठिकाणी गेला तर मोठ्या प्रमाणात तामिळ समुदाय त्याच्याप्रती नाराज होऊ शकतो. त्याचबरोबर रजनीकांतच्या या दौºयामुळे जगभरात असाही संदेश जाण्याची शक्यता होती की, आता श्रीलंकेतील स्थिती पूर्वपदावर आली आहे. वास्तविक वीसीकेनुसार श्रीलंकेत कुठल्याही प्रकारची स्थिती बदलली नाही. २००९ पासून विस्थापित तामिळ लोकांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. ते रजनीकांतचा वापर करून जगाला चुकीचा संदेश देण्याचा त्यांचा मनोदय आहे. त्यामुळेच आम्ही रजनीकांत यांना त्यांच्या दौºयाबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला होता, असेही वीसीकेने स्पष्ट केले. टी. तिरुमावलावन यांच्या नेतृत्त्वात काम करीत असलेल्या वीसीकेने रजनीकांतचा हा विरोध तीव्र करण्याचा विचार केला होता. परंतु रजनीकांतनेच माघार घेतल्याने आता विरोध काहीसा निवळला आहे, तर लाडका प्रॉडक्शनकडून दिलेल्या माहितीनुसार, याच आठवड्याच्या सुरुवातीला घोषणा करण्यात आली होती की, ‘एंथिरन’ या चित्रपटाचा अभिनेता तामिळी लोकांना १५० घरांचा ताबा देणार आहे.