Join us  

जेव्हा साडी नेसून आलेल्या बिग बींची राजेश खन्ना यांनी उडवलेली खिल्ली, नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 6:49 PM

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील वाद हा चर्चेचा विषय ठरला होता.

बिग बी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना या दिग्गज अभिनेत्यांनी बॉलिवूड गाजवलं. राजेश खन्ना आज आपल्यात नसले तरी त्यांच्या सुपरहिट चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. 'नमक हराम', 'आनंद' आणि 'नसीब' या चित्रपटांत ते एकत्र दिसले होते. त्या दोघांमधील वाद हा बॉलिवूडप्रमाणेच चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. 

राजेश खन्ना यांनी लावारिस चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमितभा बच्चन यांची खिल्ली उडवली होती. पत्रकार यासिर उस्मान यांनी 'कुछ तो लोग कहेंगे' चित्रपटात हा किस्सा सांगितला आहे. राजेश खन्ना यांचा जीवनपट या पुस्तकातून त्यांनी मांडला आहे. या पुस्तकात त्यांनी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यातील वादावरही भाष्य केलं आहे. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या लावारिस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली होती. 

राजामौलींच्या चित्रपटात प्रवीण तरडे साकारणार खलनायकाची भूमिका, म्हणाले, "त्यांनी मला पाहिल्यावरच..."

ट्रक ड्रायव्हरने प्रसिद्ध अभिनेत्रीचं केलेलं अपहरण, म्हणाली, "किडनॅप करुन त्याने मला..."

लावारिस चित्रपटातील मेरे अंगने मे या गाण्यात अमिताभ बच्चन साडी नेसून महिलांच्या वेशात आलेले दिसले. त्यांचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. पण, बिग बींच्या या लूकची राजशे खन्ना यांनी खिल्ली उडवली होती. लावारिस चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजेश खन्ना आणि बिग बींमधील सेटवर घडलेला हा किस्सा कुछ तो लोग कहेंगे या पुस्तकात सांगितला आहे.  

टॅग्स :अमिताभ बच्चनराजेश खन्ना