Join us  

राजामौलीचा आवडता प्रश्न, ‘कट्टप्पा ने बाहुबली को क्यों मारा’?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 11:33 AM

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना ‘कट्टप्पा ने बाहुबली को क्यों मारा’ हा प्रश्न विचारल्यानंतर आनंद वाटतो. हे सर्वत्र लोकप्रिय ...

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना ‘कट्टप्पा ने बाहुबली को क्यों मारा’ हा प्रश्न विचारल्यानंतर आनंद वाटतो. हे सर्वत्र लोकप्रिय कोडे झाले आहे. भाषांची बंधने तोडून हा चित्रपट यशस्वी झाल्याचे यामधून दिसून येते, असे त्यांना वाटते. राजामौली म्हणाले, ते आणि निर्माते यांना प्रत्येक दिवशी हा प्रश्न विचारण्यात येतो. ते कधीच थकत नाहीत. यामुळे दुसरा भाग केव्हा येतो, याकडे लोक लक्ष ठेवून असल्याचे  लक्षात येते. कोणीही हा प्रश्न विचारला तर आम्हाला आवडते. किती वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, याची आम्ही गणना करु शकत नाही. हा केवळ माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण टीमसाठी उत्सुकता दर्शक प्रश्न आहे. आम्हाला भाषा आणि प्रांताची बंधने तोडल्याचा आनंद अधिक आहे’, असे ते म्हणाले.बाहुबली हा चित्रपट सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानासाठी गौरविण्यात आला. भारताबाहेरील दर्शकांकडूनही याचे कौतुक करण्यात आले. यापूर्वी राजामौली यांनी विक्रमारकुडू, मगधीरा आणि एग्गा या लोकप्रिय तेलुगु चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.‘मानवी भावनांवर आधारित कथेसाठी कोणतेही बंधन नसल्याचा आमचा विश्वास आहे. प्रांताबाहेरही त्याची ओढ आहे. तुमच्याकडे जर अशी कथा असेल तर मला खात्री आहे, ती अपेक्षेपक्षा अधिक पुढे जाते. परंतु यापूर्वी कोणी असा सिद्धांत मांडलेला नव्हता. त्यामुळे मी चित्रपट निर्माण करताना किती आश्वस्त असतो हे सांगता येत नाही’, असे राजामौली म्हणाले.भारतीय बॉक्स आॅफिस हिट ठरल्यानंतर राजघराण्यातील बदल्याच्या संघर्षावरील हा चित्रपट आता चीनमध्ये प्रदर्शित होतो आहे. भारतापेक्षा अधिक म्हणजे ६५०० स्क्रीन्सवर याचे प्रदर्शन होणार आहे. बाहुबली २ हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शन होईल. उशीराचे कारण सहेतूक असल्याचे राजामौली यांनी सांगितले.