Join us

​रईस- काबिलमध्ये या गोष्टींचे आहे साम्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2017 22:11 IST

बॉलिवूड मधील दोन सुपरस्टार २५ जानेवारीला एकमेकांना स्पर्धा करताना दिसणार आहेत. एकीक डे शाहरुख खानचा बहुचर्चित रईस हा चित्रपट ...

बॉलिवूड मधील दोन सुपरस्टार २५ जानेवारीला एकमेकांना स्पर्धा करताना दिसणार आहेत. एकीक डे शाहरुख खानचा बहुचर्चित रईस हा चित्रपट आहे तर दुसरीकडे हृतिक रोशनचा काबिल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रईस व काबिल या चित्रपटांचे ट्रेलर पाहिल्यावर हे दोन्ही चित्रपट उजवे असल्याचे लक्षात येते. मात्र दोन्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एकच आहे असे नव्हे तर या दोन्ही चित्रपटात अनेक गोष्टींचे साम्य आहे. एका हिटची गरज : मागील वर्षी शाहरुख खानचे दोन तर हृतिक रोशनचा एक चित्रपट रिलीज झाला. शाहरुख खानचा ‘फॅन’ हा बॉक्स आॅफिसवर कमाई करू शकला नाही. दुसरीकडे हृतिक रोशनचा मोहेंजोदरो हा चित्रपटही फ्लॉप ठरला. यामुळे दोघांना एका हिट चित्रपटाची गरज आहे. शाहरुखचा डिअर जिंदगी हिट ठरला असला तरी त्यात त्याची मुख्य भूमिका नव्हती. दमदार अ‍ॅक्शन : दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर पाहिल्यावर दोन्ही चित्रपटातून त्यांच्या चाहत्यांना दमदार अ‍ॅक्शन दृष्ये पहायला मिळणार असल्याचे दिसते. एकीकडे शाहरुख खान ‘रईस’मध्ये अवैध धंद्यात गुंतलेला व्यवसायिकाची भूमिका करीत आहे. तर काबिलमध्ये अंध व्यक्तीची भूमिका साकारणारा हृतिक रोशन आपल्या पत्नीच्या हत्येचा बदला घेताना दिसणार आहे. आयटम साँग : रईसमध्ये सनी लिओनीने ‘लैला मै लैला’ या गाण्यावर आयटम नंबर केला आहे. तिचे हे गाणे यू-ट्युबर चांगलेच हिट ठरले आहे. तर काबिलमध्ये उर्वर्शी रौतेला हिने ‘सारा जमाना’ या गाण्यावर आयटम नंबर केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही आयटम नंबर एकमेकांच्या तोडीचे असून त्याचे चित्रकरणही एकमेकांना पुरक आहे. यासोबतच ‘काबिल‘ व ‘रईस’ मधील रोमांटिक गाणी चांगलीच हिट ठरली आहे. नव्या जोड्या : रईस व काबिल या दोन्ही चित्रपटात चाहत्यांना फ्रेश जोड्या पहायला मिळणार आहेत. काबिलमध्ये हृतिक रोशन व यामी गौतम ही फ्रेश जोडी आहे दोघांची केमेस्ट्री चांलगीच जुळून आली आहे. रईसमध्ये शाहरुख खान पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिच्यासोबत झळकणार आहे. माहिरा खानसाठी रईस हा बॉलिवूड डेब्यू ठरणार आहे. नवे दिग्दर्शक : शाहरुख खान प्रथमच दिग्दर्शक राहुल ढोलकिया याच्या दिग्दर्शनात काम करीत आहे. वास्तवादी चित्रीकरणासाठी राहुल ढोलकीयाची ओळख आहे. त्याच्या परझानिया या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता प्रथमच राकेश रोशनच्या प्रोेडक्शन हाऊसचा चित्रपट दिग्दर्शित करीत असून अ‍ॅक्शनपटासाठी त्याची ओळख आहे. दोन्ही अभिनेत्यांनी या पूर्वी त्यांच्या चित्रपटात काम केलेले नाही. कठोर मेहनत : रईससाठी शाहरुख खानने कठिण परीश्रम घेतले आहेत. या चित्रपटासाठी त्याने आपल्या आवाजात व लूकमध्येही बदल केला आहे. दुसरीकडे हृतिक रोशन प्रथमच अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. यासाठी हृतिकने ब्रेल लिपीसह अंध व्यक्तीना दिले जाणारे प्रशिक्षण घेतले. प्रमोशल इव्हेंट : रईसच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर करण्यात आला. रईस या चित्रपटाच्या डायलॉग प्रोमोपासून ते गाण्यांपर्यंत प्रमोशनसाठी ट्विटरचा वापर करण्यात आला. काबिलचे प्रमोशन या दृष्टीने मागे पडले असले तरी हृतिक व या चित्रपटाशी जुळलेल्या लोकांना प्रमोशन करण्यात कचुराई केली नाही.