Join us  

​ ‘आशिकी’ फेम राहुल रॉयला आता तरी मिळेल का यश?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 4:40 AM

९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आशिकी’ कोण विसरू शकेल? या चित्रपटाप्रमाणेच यातील कलाकारांनाही  विसरता येणे शक्य नाही. आम्ही बोलतोयं, ...

९० च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आशिकी’ कोण विसरू शकेल? या चित्रपटाप्रमाणेच यातील कलाकारांनाही  विसरता येणे शक्य नाही. आम्ही बोलतोयं, ते या चित्रपटातील मुख्य अभिनेता राहुल रॉयबद्दल. होय, राहुल दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये दिसलेला नाही. पण तरिही ‘आशिकी’ आठवला की, त्याचा चेहराही हमखास आठवतो. हाच, राहुल रॉय आता मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. ‘वेलकम टू रशिया’ या चित्रपटात तो पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. २००७ मध्ये आलेल्या ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनचा विजेता राहिलेला राहुल तब्बल ९ वर्षे आॅस्ट्रेलियात होता. येथे ९ वर्षे घालवल्यानंतर २०१५ मध्ये तो भारतात परतला.राहुलच्या कमबॅक चित्रपटाबद्दल सांगायचे तर हा चित्रपट एक लव्हस्टोरी आहे. यात राहुल   रशियन आणि भारतीय अशा दोन्ही पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसेल. निश्चितपणे या चित्रपटात राहुलची भूमिका अतिशय रोचक आहे. यंदा येऊ घातलेल्या या चित्रपटात राहुलचा लूकही अनोखा असणार आहे. साहजिकच राहुल याबद्दल प्रचंड उत्सूक आहे. ही भूमिका प्रचंड इंटरेस्टिंग आहे. नितीन गुप्ता हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. चित्रपटाची कथा शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट आहे. चित्रपटातील लव्ह अँगलही अनोख्या पद्धतीने चित्रीत केला आहे, असे राहुलने सांगितले.ALSO READ : तुम्हाला माहितेय का बिग बॉस १चा विजेता राहुल रॉय सध्या काय करतोय?१९९० मध्ये आलेला महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ हा राहुलचा पहिला चित्रपट होता. या पहिल्याच चित्रपटाने राहुलला एका रात्रीत स्टार बनवले. प्रचंड लोकप्रीयता मिळवून दिली. पण यानंतरकाळात राहुल आपले हे स्टारडम टिकवू शकला नाही. ‘आशिकी’नंतरचा त्याचा एकही चित्रपट बॉक्सआॅफिसवर रंग दाखवू शकला नाही. पुढे तर तो बॉलिवूडमधून जणू बादचं झाला. याकाळात आपले अ‍ॅक्टिंग करिअर टिकवून ठेवण्यासाठी राहुलला काही सी ग्रेड चित्रपटातही काम करावे लागले. राहुल आणि अभिनेत्री मनीषा कोईराला या दोघांच्या लव्ह अफेअरच्या चर्चा रंगल्या. तसेच पूजा भट्टसोबतही राहुलचे नाव जोडले गेले. पण त्याचे लव्ह लाईफही अपयशीचं ठरले. अलीकडे राहुलने राजकारणात हात आजमावण्याचा निर्णय घेतला आणि तो भाजपात सामील झाला. अद्याप राजकारणात  राहुल नवखा आहे. पण अभिनय क्षेत्रात मात्र राहुलने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. आता त्याचा हा कमबॅक सिनेमा त्याला किती यश मिळवून देतो, ते बघूच.