Join us  

राधिका आपटेचा नवरा आहे खूप हॅण्डसम, पहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 6:00 AM

अभिनेत्री राधिका आपटे हिचा नवरा लंडनमध्ये वास्तव्यास असून तो संगीतकार आहे.

अभिनेत्री राधिका आपटे हिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. राधिकाचा अलीकडे रिलीज झालेला चित्रपट ‘अंधाधुन’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यानंतर आता ती  द वेडिंग गेस्ट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता देव पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सध्या राधिका या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. फार कमी लोकांना राधिकाच्या नवऱ्याबद्दल माहित आहे.

राधिकाच्या नवऱ्याचं नाव बेनेडिक्ट टेलर असून तो लंडनमध्ये स्थायिक आहे. तो एक संगीतकार आहे. राधिका व टेलरनं २०१२ साली लग्न केलं. राधिकाला शूटिंगमधून जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा ती लंडनला जाते. 

असं सांगितलं जातं ती राधिका व बेनेडिक्ट यांची भेट २०११ साली झाली होती जेव्हा राधिका कंटेम्परेरी डान्स शिकण्यासाठी लंडनला गेली होती. एक वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी २०१२ साली लग्न केलं आणि २०१३मध्ये अधिकृतपणे जाहीर केलं होतं.

राधिका म्हणाली, जेव्हा टेलरने मला डेट करायला सुरूवात केली होती. त्यावेळी त्याने आपली नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आम्हा दोघांना हे योग्य वाटले नाही. आम्ही दोघे आमच्या करियरकडे गांभीर्याने पाहतो. त्यामुळे काम सोडून आम्ही दोघेही खूश राहू शकत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही कामांना प्राधान्य देतो व एकमेकांना नेहमी प्रोत्साहन देतो.

द वेडिंग गेस्ट चित्रपटाशिवाय राधिका लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत रात अकेली है चित्रपटात झळकणार आहे.

टॅग्स :राधिका आपटेदेव पटेल