Join us  

राधिका आपटे पुन्हा एकदा झळकणार तमीळ सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 6:44 PM

'चिथिरम पेसूथाडी २' या सिनेमात राधिका आपटे झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

ठळक मुद्दे राधिकाचे २ वर्षानंतर तमीळ चित्रपटात कमबॅकराधिका 'चिथिरम पेसूथाडी २'मध्ये मुख्य भूमिकेत

अभिनेत्री राधिका आपटेने आजवर हिंदी, मराठी, तमीळ, तेलगू व मल्याळम सिनेमात काम केले आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तसेच 'सेक्रेड गेम्स', 'घुल' यांसारख्या वेबसीरिजमधूनही तिने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आता ती दोन वर्षानंतर तमीळ चित्रपटात कमबॅक करते आहे. 'चिथिरम पेसूथाडी २' या सिनेमात राधिका आपटे झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवळपास या दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये राधिकाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते आहे. या चित्रपटात तिचा लूक साधा आहे. हा चित्रपट क्राईम ड्रामावर आधारीत असून यात दमदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे.२००६ साली प्रदर्शित झालेला 'चिथिरम पेसूथाडी' या तमीळ चित्रपटाचा हा सीक्वल आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नसून लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येणार आहे. या चित्रपटात राधिकासोबत विधार्थ, अजमल अमीर, अशोक, निवास अदिथन, गायत्री, निवेदिता, नंदन व प्रिया बॅनर्जी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  

'कबाली' या तमीळ चित्रपटात राधिकाने शेवटचे काम केले होते. या सिनेमात ती दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतसोबत दिसली होती. या चित्रपटानंतर आता ती चिथिरम पेसूथाडी२ मध्ये काय कमाल दाखवते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

राधिकाबद्दल सांगायचे तर, २००५ मध्ये राधिकाने  ‘वाह, लाईफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होता. यानंतर ‘शोर इन द सिटी’, ‘कबाली’,‘बदलापूर’, ‘मांझी- द माऊंटेन मॅन’ अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे. हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केलेय. राधिकाची गणना मेनस्ट्रीम सिनेमाच्या टॉप मोस्ट अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी तिची एक वेगळी फॅन फॉलोर्इंग आहे. दमदार अभिनयासाठी राधिका ओळखली जाते. तशीच एक बोल्ड अ‍ॅक्ट्रेस अशीही तिची ओळख आहे. तिच्या अनेक बोल्ड फोटोशूट आणि सीन्सवर वादंग माजले होते.

टॅग्स :राधिका आपटेरजनीकांत