Join us  

आर. माधवनच्या त्या व्हिडिओची होतेय सोशल मीडियावर चर्चा, पहा त्याचा हा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 4:06 PM

अभिनेता आर. माधवनचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो.

ठळक मुद्दे 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एस. नंबी नारायणन यांच्या भूमिकेत अभिनेता आर.माधवन

अभिनेता आर. माधवनचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो. आता नुकताच आर. माधवनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो या भूमिकेच्या गेटअपची तयारी करताना दिसतो आहे. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपटात एस. नंबी नारायणन यांच्या भूमिकेत अभिनेता आर.माधवन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकताच आर. माधवनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो या चित्रपटातील लूकची तयारी करताना दिसतो आहे. या व्हिडिओत माधवन केसांना कलर करताना दिसतो आहे. नंबी नारायणन यांच्या वयस्क लूकसाठी केस कलर करत असल्याचे त्याने लिहिले आहे.

नंबी नारायणन हे इस्रोमधील एक शास्त्रज्ञ असून त्यांना १९९४मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. नंबी नारायणन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपट तमीळ, तेलगू, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नंबी यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे व या भूमिकेत आर. माधवनला पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :आर.माधवनरॉकेट्री : द नंबी इफेक्ट