आर. माधवन बनणार एअरफोर्स पायलट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 13:23 IST
अभिनेता आर. माधवन अर्थात तुमचा आमचा लाडका मॅडी दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर झळकला नाही. पण आता माधवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची ...
आर. माधवन बनणार एअरफोर्स पायलट!
अभिनेता आर. माधवन अर्थात तुमचा आमचा लाडका मॅडी दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर झळकला नाही. पण आता माधवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माधवन लवकरच ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटात झळकणार आहे. बॉलिवूडची पहिली ‘स्पेस मुव्ही’ असलेल्या या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. सुशांत यात अंतराळवीराच्या भूमिकेत आहे. याच चित्रपटात आर. माधवन ही एका दमदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. होय, यात माधवन एअर फोर्स पायलटची भूमिका साकारताना दिसणार आहे. निश्चितपणे या भूमिकेबद्दल मॅडी प्रचंड उत्सूक आहे. मी हा चित्रपट करण्यास अतिशय उत्सूक आहे. केवळ करायलाच नाही तर हा चित्रपट कधी एकदा मुलांसोबत बसून बघतो, असे मला झालेय, असे मॅडी म्हणाला.तूर्तास सुशांत या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतोय. मॅडीची सुद्धा अशीच काही तयारी सुरु आहे का? हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडणारच. हाच नेमका प्रश्न आम्ही मॅडीला विचारला, यावर मॅडीचे उत्तर होकारार्थी होते. तो म्हणाला, होय, भूमिका अधिकाधिक जिवंत वाटावी, यासाठी तयारी करण्याची गरज असतेच. माझा सुद्धा ही भूमिका पडद्यावर अधिकाधिक जिवंत करण्याचाच प्रयत्न आहे. यासाठी मी खरोखरीच विमान चालवण्याचे धडे वगैरे घेत नाहीय. पण माझ्या परीने याची तयारी मात्र सुरु केलीय.‘चंदा मामा दूर के’मध्ये माधवनला पाहणे निश्चितपणे एक अनोखा अनुभव असणार आहे. तुम्ही उत्सूक आहात, तेवढेच आम्हीही त्याला एअरफोर्स पायलटच्या रूपात पाहण्यास आतूर आहोत. अर्थात त्यासाठी आपणासर्वांना काही काळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे.