Join us

लिंकअपच्या बातम्यांवर अशी काही बोलली हुमा कुरेशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 12:56 IST

अभिनेत्री हुमा  कुरेशीसाठी तिच्या लिंकअपच्या बातम्यांची चर्चा नवी नाही. अनेकदा या चर्चांकडे हुमा साफ दुर्लक्ष करते तर कधीकधी तिला ...

अभिनेत्री हुमा  कुरेशीसाठी तिच्या लिंकअपच्या बातम्यांची चर्चा नवी नाही. अनेकदा या चर्चांकडे हुमा साफ दुर्लक्ष करते तर कधीकधी तिला या चर्चांचा प्रचंड राग येतो. सध्या चर्चा रंगतेय ती हुमा व सोहेल खान यांच्या लिंकअपची. कदाचित या चर्चेमुळे हुमा प्रचंड नाराज आहे. अलीकडे एका मुलाखतीत तिने तिची ही नाराजी बोलून दाखवली. अशा बातम्या येतात तेव्हा अनेकदा संताप अनावर होतो. मी सोशल मीडियावर जाऊन अशा चर्चांना उत्तर देते. जी व्यक्ति तुम्हाला भावासारखी आहे, अशा व्यक्तिशी तुमचे अफेअर असल्याच्या चर्चा येतात, तेव्हा प्रचंड मनस्ताप होतो. अशा चर्चा ऐकणे खरच खूप दुर्दैवी आहे. अशास्थितीत मी केवळ सोशल मीडियावर जाऊन या बातम्यांचे खंडन करू शकते. यापलीकडे माझ्या हातात आहे तरी काय? असे हुमा म्हणाली.ALSO READ : हुमाला सलमानच्या घरी ‘नो एन्ट्री’?हुमा म्हणते, सोहेल माझ्या भावासारखा​या लिंकअपच्या बातम्यांमुळे तुझे कुटुंब प्रभावित होत नाही का? असे विचारले असता, हुमाने नकारार्थी उत्तर दिले. अजिबात नाही. कारण काय खरे आहे, हे माझ्या कुटुंबाला माहित आहे. मी स्वत:सुद्धा अनेकदा या बातम्यांकडे दुर्लक्ष करणे पसंत करणे. माझ्यासाठी या बातम्यांपेक्षा माझे काम आणि माझे चाहते या दोन गोष्टी महत्त्वाचा आहेत, असे ती म्हणाली. सोहेलआधी हुमाचे नाव दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत जोडले गेले होते. अनुरागच्या ‘गँग आॅफ वासेपूर’ या चित्रपटातून हुमाने बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर हुमा व अनुरागच्या लिंकअपच्या बातम्यांना ऊत आला होता. लवकरच हुमा ‘जॉली एलएलबी2’मध्ये दिसणार आहे. यात हुमा अक्षय कुमारशी आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.