Join us  

सलमान खानने ‘या’ चित्रपटातून गाळले पाकी सिंगर आतिफ असलमचे गाणे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 10:11 AM

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे बॉलिवूडमध्ये  तीव्र पडसाद उमटत आहेत. बॉलिवूडच्या अनेकांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आता यापुढे जात, इंडस्ट्रीने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी लादली आहे.

ठळक मुद्देनोटबुक’ या चित्रपटातून मोहनीश बहल याची मुलगी प्रनुतन आणि जहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत.

गत १४ फेबु्रवारीला जम्मू काश्मिरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे बॉलिवूडमध्ये  तीव्र पडसाद उमटत आहेत. बॉलिवूडच्या अनेकांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत, हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. आता यापुढे जात, इंडस्ट्रीने पाकिस्तानी कलाकारांवर पूर्णपणे बंदी लादली आहे. फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईजने पाकी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.  म्युझिक कंपनी टी-सीरिजनेही पाकिस्तानी गायकांनी गायलेली गाणी हटवली आहेत. यात पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान अशा पाकी गायकांचा समावेश आहे. सलमान खान यानेही पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आतिफ असलमने गायलेले एक गाणे आपल्या चित्रपटातून काढून टाकले आहे. सलमान खान निर्मित ‘नोटबुक’मध्ये आतिफ असलमने गायलेले एक गाणे होते. हे गाणे गाळण्याचा आदेश सलमानने दिला आहे.

ताज्या बातमीनुसार, या गाण्याचे आता नव्याने रेकॉर्डिंग होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे रेकॉर्डिंगचे काम पूर्ण होईल. ‘नोटबुक’ या चित्रपटातून मोहनीश बहल याची मुलगी प्रनुतन आणि जहीर इक्बाल हे दोन नवे चेहरे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. येत्या मार्चमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  प्रनूतन ही अभिनेत्री नूतन यांची नात आहे. नूतन या आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. प्रनूतनच्या नावातचं नूतन असल्याने साहजिकचं तिच्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा  आहेत.  २५ वर्षांच्या प्रनूतनने मुंबई विद्यापीठातून बीएलएस एलएलबीची पदवी घेतली आहे़ तिला नृत्याचीही आवड आहे.मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधलं मैत्रीचं नातं खूपच जुनं आहे. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है यासांरख्या चित्रपटात सलमान आणि मोहनीशने एकत्र काम केले आहे. हम आपके है कौन, हम साथ साथ है या दोन्ही चित्रपटांत मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :सलमान खानपुलवामा दहशतवादी हल्लाप्रनूतन बहल