Join us

​प्रियंकाला व्हाईट हाऊसचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 16:49 IST

आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच गाजतेयं. ‘क्वान्टिको’या अमेरिकन मालिकेतील तिच्या अभिनयाचे कौतुक होतेय. याच मालिकेच्या दुसºया ...

आपली पीसी अर्थात प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच गाजतेयं. ‘क्वान्टिको’या अमेरिकन मालिकेतील तिच्या अभिनयाचे कौतुक होतेय. याच मालिकेच्या दुसºया सिझनमध्ये सध्या ती बिझी आहे. पाठोपाठ ‘बेवॉच’ हा हॉलिवूडपटही तिच्याकडे चालून आला आहे. नुकत्याच झालेल्या आॅस्करमध्ये प्रेझेंटर म्हणूनही प्रियंका दिसलेली आहे. एकंदरच पीसीचे स्टार सध्या चांगलेच जोरावर आहे. आत्ता तर मॅडमला व्हाईट हाऊसचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळेच. प्रियंका लवकरच अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत डिनर घेताना दिसू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाला या महिन्याअखेर होणाºया वार्षिक ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्ट्स डिनर’चे निमंत्रण मिळाले आहे. याला डिनरला अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओकामा याही उपस्थित राहणार आहेत. ब्राडले कूपर, लुसी लीन यासारखे दिग्गजही यावेळी हजर राहणे अपेक्षित आहे. सध्या प्रियंका ‘क्वान्टिको २’ आणि ‘बेवॉच’च्या शूटींगमध्ये जाम बिझी आहे. अशास्थितीत प्रियंकाने हे निमंत्रण स्वीकारले की नाही, तूर्तास हे गुलदस्त्यात आहे.