Join us

प्रियांकाचा पार्टी टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला ‘बी टाऊन’च्या सर्व सेलिब्रिटी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत प्रियांकाचा अनोखा अंदाज पहावयास मिळाला.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अलीकडेच एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला ‘बी टाऊन’च्या सर्व सेलिब्रिटी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीत प्रियांकाचा अनोखा अंदाज पहावयास मिळाला.‘आॅल टाईम फेव्हरेट’ ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ही गोल्डन रंगाची साडी नेसून येथे आली होती. तिचा हा अंदाज पाहण्यासारखा होता.एका नजरेत पाहणाऱ्या व्यक्तीला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे इशा गुप्ता. तिने एन्ट्री घेताच सर्वांच्या नजरा तिच्याकडे आकर्षित झाल्या.अनिल कपूरने अशा स्टायलिश अंदाजात यावेळी फोटोग्राफर्सना पोझ दिली.बॉलिवूडचे चिंटू काका म्हणजेच अभिनेता ऋषी कपूर यांनीही या पार्टीला हजेरी लावून चार चाँद लावले.गोल्डन रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस घालून आलेली कंगना रणौत ही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित ही अशा सिल्क ड्रेसिंगमध्ये या पार्टीला आली होती.काळ्या रंगाचा कुर्ता आणि पलाझो पँट घालून अभिनेत्री सुष्मिता सेन या पार्टीला आली होती. तिचा पिवळ्या रंगाचा गॉगल आणि लाल रंगाची पर्स तिला खुलून दिसत होती.निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी या पार्टीत हजेरी लावून पार्टीची रंगत द्विगुणित केली.