Join us  

Priyanka Nick Wedding : पाहा, प्रियांका व निकच्या लग्नाचे काही नवे फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 10:44 AM

या फोटोतील निक व प्रियांकाची बॉन्डिंग बघण्यासारखी आहे. एका फोटोत प्रियांका लग्नमंडपात जात असताना दिसतेय.

ठळक मुद्दे या फोटोंमध्ये प्रियांकाने लाल रंगाचा लेहंगा घातलेला आहे तर निक पांढ-या-गुलाबी रंगाच्या शेरवानीत आहे. कुटुंबासोबतही त्यांनी पोज दिली आहे. या फॅमिली फोटोत निकचे अख्खे कुटुंब दिसतेय.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवन येथे ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. गत १ डिसेंबरला दोघेही ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले आणि दुसºया दिवशी २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांका व निकच्या लग्नाचा एकही फोटो लीक झाला नाही. कारण या लग्नाच्या फोटोचे हक्क एका मॅगझिनला विकण्यात आले होते. त्यामुळे लग्नानंतर तिस-या दिवशी लग्नाचे आॅफिशिअल फोटो जारी करण्यात आले. आता मात्र निकयांकाच्या   विवाहाचे आणखी काही नवे फोटो समोर आले आहेत.  यात कपल लग्नविधी पूर्ण करताना दिसतेय.

हॅलो मॅगझिनने लग्नाचे नवे फोटो जारी केले आहेत. या फोटोतील निक व प्रियांकाची बॉन्डिंग बघण्यासारखी आहे. एका फोटोत प्रियांका लग्नमंडपात जात असताना दिसतेय.एका फोटोत प्रियांका हातात वरमाला घेऊन आहे.

या फोटोंमध्ये प्रियांकाने लाल रंगाचा लेहंगा घातलेला आहे तर निक पांढ-या-गुलाबी रंगाच्या शेरवानीत आहे.

कुटुंबासोबतही त्यांनी पोज दिली आहे. या फॅमिली फोटोत निकचे अख्खे कुटुंब दिसतेय.

ख्रिश्चन पद्धतीचे काही नवे फोटोही शेअर करण्यात आले आहेत. यात निक व प्रियांका दोघेही कमालीचे आनंदी दिसत आहेत.लग्नानंतर गत मंगळवारी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलात प्रियांका व निकचे ग्रॅण्ड रिसेप्शन झाले. तू या आनंदाला १ ते १० पैकी किती गुण देशील, असे प्रियांकाला यावेळी विचारण्यात आले. यावर तिने मी माझ्या आनंदाला १२ गुण देईल, असे प्रियांका म्हणाली. लग्नानंतरच्या थकव्याबद्दल विचारले असता, ही थकण्याचा नाही तर सेलिब्रेशनची वेळ आहे, आनंद साजरा करण्याची वेळ आहे, असे ती म्हणाली. 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास