Join us

शाही लग्नाच्या रॉयल रिसेप्शनमध्ये दिसला प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 12:32 IST

प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकले. ब्रिटनमध्ये स्वकीय, आप्तेष्ट आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत लग्नाचा विधी सोहळा पार पडला. ...

प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकले. ब्रिटनमध्ये स्वकीय, आप्तेष्ट आणि मित्रमंडळीच्या उपस्थितीत लग्नाचा विधी सोहळा पार पडला. लग्नाच्या दिवशी मात्र, भारतीयांचे लक्ष प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांच्या रॉयल वेडिंगपेक्षा प्रियांका चोप्रा हिच्याकडेच जास्त लागलेले होते. त्यासाठी कारणही तसेच होते. माजी मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधील एकमेव अशी अभिनेत्री आहे, जी या ऐतिहासिक लग्नाची साक्षीदार बनली. तिला या लग्नाचे विशेष निमंत्रण देण्यात आले होते. तिने याबाबतचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, त्यामध्ये नवरीच्या मैत्रिणींसोबत ती हसताना दिसत होती. मात्र, नुकताच तिने या लग्नाच्या रिसेप्शनमधील एक हॉट अंदाजातील फोटो शेअर केला आहे. तिचा हा हॉट अंदाज तुम्हाला नक्कीच भूरळ घालणार, यात काहीच शंका नाही.ब्रिटनला जाण्यापूर्वी प्रियांका चोप्रा कॅलिफोर्नियात तिच्या फॅमिलीसोबत सुट्टया एन्जॉय करायला गेली होती. तिने कॉलिफोर्नियामधील फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला होता. क्वांटिकोच्या सीझन 3 चे प्रमोशन संपल्यानंतर प्रियांका रिलॅक्स मूडमध्ये दिसली. कॉलिफोर्नियाच्या बीचवरील लाल रंगाच्या बिकनीमधील फोटो तिने शेअर केला होता. यात ती कमालीची स्टायलिश अंदाजात दिसते आहे. अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या माध्यमातून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने दोन चित्रपटांमध्ये देखील काम केले. लवकरच देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये देखील कमबॅक करणार आहे. सलमान खानच्या भारत चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. ‘भारत’साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ मध्ये प्रियांकासोबत कॅटरिना कैफ असल्याचेही मानले जात आहे. सर्वात आधी २००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात सलमान व प्रियांका एकत्र दिसले होते. यानंतर ‘सलाम ए इश्क’ आणि ‘गॉड तुस्सी गे्रट हो’ मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. तूर्तास प्रियांका या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे गुलदस्त्यात आहे.