प्रियांका चोप्राच्या ‘गोल्ड’ स्टाईलला दीपिका पदुकोणने केले आणखी ‘बोल्ड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:04 IST
दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा हॉलीवूडमध्ये बॉलीवूडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ‘क्वांटिक’द्वारे अमेरिकेत चांगलाच जम बसवलेल्या प्रियांका पाठोपाठ दीपिकानेही ‘ट्रिपल ...
प्रियांका चोप्राच्या ‘गोल्ड’ स्टाईलला दीपिका पदुकोणने केले आणखी ‘बोल्ड’
दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा हॉलीवूडमध्ये बॉलीवूडचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ‘क्वांटिक’द्वारे अमेरिकेत चांगलाच जम बसवलेल्या प्रियांका पाठोपाठ दीपिकानेही ‘ट्रिपल एक्स’ सिनेमात काम करून दबदबा निर्माण केला आहे. हिंदी सिनेमासृष्टीत स्पर्धक असणाऱ्या या दोघी एकमेकींवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही.प्रियांका चोप्राने नुकतेच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब्स पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर गोल्डन रंगाचा व्ही-नेक ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते. डार्क लिपिस्टिकमधील तिचा हा रेड कार्पेटवरील गोल्डन अवतार फॅशन जगतात खूपच गाजतोय.प्रियांकाची अशी तारीफ होत असताना दीपिका तरी कशी मागे राहणार. मुंबईत पार पडलेल्या तिच्या पहिल्या हॉलीवूडपटाच्या प्रीमियरमध्ये तिने गोल्डन रंगाचाच गाऊन परिधान केला; परंतु तिच्या ड्रेसचे व्ही-नेक बऱ्याच खाली जाणारे होते. प्रियांकाच्या लो व्ही-नेकला आणखी बोल्ड रुप देत दीपिकाने व्हेरी लो व्ही-नेक गाऊन घालून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. गोल्ड अँड बोल्ड : प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणदोघींनी एकाच स्टाईलचे व रंगाचे ड्रेस घातल्यामुळे तुलना होणे स्वभाविक आहे. प्रथमच गोल्डन ग्लोब्समध्ये सहभागी होणाऱ्या प्रियांकाने राल्फ लॉरेनने डिझाइन केलेला चकचकीत गोल्डन गाऊन रेड कार्पेटसाठी घातला होता. यावेळी तिच्या हस्ते टीव्ही विभागातील बेस्ट अॅक्टर (ड्रामा) पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.cnxoldfiles/a>यावेळी विन डिझेलसह रणवीर सिंग, शाहिद कपूर, करण जोहर, अली फजल, साजिद नाडियादवाला, हुमा कुरेशी यासारखे अनेक दिग्गज बॉलीवूड सेलिब्रेटी उपस्थित होते. काल विन डिझेलचे स्वागत पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने करण्यात आले होते. भारतीयांचे प्रेम पाहून भारावून गेल्याची त्याने प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली.