प्रियांका चोप्राचा दीपिका पादुकोणला असाही टोमणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2017 15:11 IST
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या यशाच्या शिखरावर आहे. हॉलिवूडमध्ये प्रियांकाने अभूतपूर्व यश मिळवलं. इतकं की, सध्या फॉरेन मीडियात प्रियांकाचाच ...
प्रियांका चोप्राचा दीपिका पादुकोणला असाही टोमणा!
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या यशाच्या शिखरावर आहे. हॉलिवूडमध्ये प्रियांकाने अभूतपूर्व यश मिळवलं. इतकं की, सध्या फॉरेन मीडियात प्रियांकाचाच बोलबाला आहे. तूर्तास प्रियांका तिच्या पहिल्यावहिल्या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रियांकाचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘बेवॉच’लवकरच रिलीज होतो आहे. पण ‘बेवॉच’ रिलीज होतोय, म्हणून प्रियांका अजिबात टेन्शन-बिन्शनमध्ये नाहीय. ‘बेवॉच’ रिलीज होतोय, यामुळे कसला दबाव जाणवतो का? असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला. यावेळी प्रियांकाचे उत्तर हे उत्तर कमी अन् टोमणाचं जास्त वाटलं.‘माझे करिअर कधीच कुण्या दुसºयाच्या करिअरवर अवलंबून नव्हते. हे खूप खास आहे. कुणाच्या चित्रपटाने चांगले प्रदर्शन केले वा नाही, याच्याशी मला काय देणेघेणे’, असे प्रियांका अगदीच तोºयात म्हणाली. माझे करिअर कुण्या दुसºयाचे यश वा अपयश यावर अवलंबून नाही. यापेक्षा मी माझ्या चित्रपटांवर अधिक लक्ष देते. हा माझा ‘गंगाजल’नंतरचा दुसरा मोठा चित्रपट आहे. कारण ‘गंगाजल’नंतर मी कुठलाही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे डाव मोठा आहे, असेही ती म्हणाली. आता प्रियांकाचे हे वाक्य आम्हाला टोमणा वाटतेय, कारण तिच्या ‘बेवॉच’आधी दीपिका पादुकोणचा ‘ट्रिपल एक्स : दी झेंंडर केज’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झालेला. खरे तर दीपिकाला या चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा होत्या. पण दीपिकाचा हा हॉलिवूडपट आपटला. दीपिकाचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. याच पार्श्वभूमीवर प्रियांका कदाचित बोलली असावी. दीपिकाचा चित्रपट यशस्वी झाला, नाही झाला. मला देणेघेणे नाही, असेच कदाचित प्रियांकाला सुचवायचे असावे. होय ना?