Join us  

प्रियांका चोप्राच्या भावाचे याआधी देखील मोडले आहे लग्न, वाचा कोणासोबत अडकणार होता विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 4:50 PM

प्रियांका चोप्राच्या भावाचे लग्न मोडण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील लग्न व्हायला काही दिवस शिल्लक असतानाच त्याने लग्न करण्यास नकार दिला होता.

ठळक मुद्देसिद्धार्थचे 2015 मध्ये कनिका माथुरसोबत लग्न होणार होते. हे लव्ह मॅरेज असून 25 फेब्रुवारी 2015 ला गोव्यात हे लग्न होणार होते. या लग्नाची तयारी कित्येक महिने आधीपासून सुरू होती. पण लग्नाची सगळी तयारी झाली असताना हे लग्न अचानक मोडले.

प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचे तुटतलेलं लग्न सध्या सगळीकडे चर्चाचा विषय ठरला आहे. प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी मुलाचे लग्न तुटल्याचे नुकतेच मीडियाला सांगितले आहे. मात्र लग्न तुटण्यामागचे कारण त्यांनी सुरुवातीला गुलदस्त्यातच ठेवले होते. पण आता स्पॉटबायला दिलेल्या मुलाखतीत मधु चोप्रा यांनी हे लग्न मोडण्याविषयीचे खरे कारण सांगितले आहे. त्या म्हणाल्या, ''माझा मुलगा सिद्धार्थचे लग्न आता होत नाही आहे. त्याला लग्न करण्यासाठी थोडा आणखी वेळ हवा आहे. मला ही वाटतेय लग्नासारख्या विषयामध्ये घाई करणं ठीक नाही.''   

या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 7 फेब्रुवारीला सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांची रोका सेरिमनी झाली होती. भावाच्या लग्नासाठी प्रियांका मुंबईत खास आली होती. तिच्यासोबत निक जोनास देखील या समारंभासाठी उपस्थित होता. लवकरच सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांचे लग्न होणार होते. मात्र इशिताच्या इमर्जन्सी सर्जरीमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली असे मीडियाला सांगण्यात आले होते. लग्न अचानक पुढे ढकलल्यामुळे प्रियांका देखील न्यूयॉर्कला परतली होती. पण लग्न पुढे ढकलल्यानंतर इशिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सिद्धार्थसोबतचे सगळे फोटो डिलीट केले होते. यात रोका सेरिमनीचे फोटोदेखील होते. इशिताला प्रियांका आणि तिची आई मधु चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केले आणि तिथेच शंकेची पाल चुकचुकली होती. 

प्रियांका चोप्राच्या भावाचे लग्न मोडण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधी देखील लग्न व्हायला काही दिवस शिल्लक असतानाच त्याने लग्न करण्यास नकार दिला होता. सिद्धार्थचे 2015 मध्ये कनिका माथुरसोबत लग्न होणार होते. हे लव्ह मॅरेज असून 2015 ला गोव्यात हे लग्न होणार होते.

या लग्नाची तयारी कित्येक महिने आधीपासून सुरू होती. पण लग्नाची सगळी तयारी झाली असताना हे लग्न अचानक मोडले. लग्न मोडण्याचे कारण सांगण्यात आले नसले तरी सिद्धार्थनेच सोशल मीडियावर पोस्ट टाकत, सिंगल... रेडी टू मिंगल लिहित लग्न मोडल्याचे सगळ्यांना याविषयी सांगितले होते.  

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास