Join us  

Priyanka Chopra Wedding : सब्‍यासाची नाही तर प्रियांका चोप्रा देणार 'या' डिझायनरला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 6:00 AM

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहे. दीपवीरने 14-15 नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमोमध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने विवाह बंधनात अडकले

ठळक मुद्देनिकने संगीत सेरेमनीसाठी खास प्लान तयार केला आहेअमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहे. दीपवीरने 14-15 नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमोमध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने विवाह बंधनात अडकले. त्यानंतर बी-टाऊनसह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेय ते प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाकडे.     

दीपिका पादुकोणच्या लग्नानंतर सर्वाधिक चर्चा आहे ते तिने परिधान केलेल्या कपड्यांची लहंगाची. दीपिका आणि रणवीने सब्यासाची डिझायन केलेला कपडे परिधान केला. याआधी अनुष्का शर्मानेदेखील सब्यासाची डिझायन केलेले लहंगा परिधान केला होता. त्यामुळे  आता प्रियांका चोप्रासुद्धा सब्यासाचीच लहंगा घालणार का ? असा प्रश्न पडला होता. मात्र प्रियांका चोप्रा सब्यासाची नाही तर अबू जानी-संदीप खोसला यांना पसंती दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

प्रियांका आणि निक नोव्हेंबर महिन्यात जोधपुरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत यांच्या लग्नाचा सोहळा चालणार आहे. 

निकने संगीत सेरेमनीसाठी खास प्लान तयार केला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला हा संगीतसोहळा होणार आहे. या संगीत सेरेमनीत निक आणि पीसी दोघेही परफॉर्म करणार आहे. निक तर खास आपल्या ट्रूपसोबत परफॉर्म करणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स ४५ मिनिटांचा असेल. यात तो प्रियांकासाठी लव्ह सॉन्ग गाताना दिसेल. अमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास