Join us  

अंबानींच्या होळी पार्टीत प्रियंका चोप्राच्या नेकलेसचीच चर्चा; किंमत ऐकून आ वासेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 1:27 PM

पार्टी अंबानींची पण चर्चा प्रियंकाची! देसी गर्लने परिधान केलेल्या नेकलेसची किंमत किती माहितीये? जाणून घ्या

प्रियंका चोप्रा तिची मुलगी मालतीसह पुन्हा मुंबईत आली आहे. बॉलिवूड गाजवणारी प्रियंका आता आंतरराष्ट्रीय स्टार झाली आहे. प्रियंका जिथे जाते तिथे तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. अशातच प्रियंका अंबानींच्या होळी पार्टीत सहभागी झाली होती. तिथे प्रियंकापेक्षा तिच्या नेकलेसचीच जास्त चर्चा दिसली. प्रियंकाचा नेकलेस वरवर दिसायला छोटा असला तरीही त्याची किंमत ऐकून तुम्ही थक्कच व्हाल.

 प्रियांका काल रात्री अँटिलियामध्ये ईशा अंबानीने आयोजित केलेल्या रोमन थीमवर आधारित होळी पार्टीला हजर होती. या पार्टीसाठी प्रियंकाने खास गुलाबी रंगाची साडी नेसली होती. प्रियंकाच्या जबरदस्त लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पण लोकांच्या नजरा प्रियांकाच्या नेकलेसवर खिळल्या. तिने बुल्गारी ब्रँडचा बहु-रंगीत हार घातला होता. एका रिपोर्टनुसार या नेकलेसची किंमत तब्बल 8 कोटी रुपये आहे.

या ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर या नेकलेसची किंमत ८,३३,८०,००० रुपये नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे छोटा दिसणारा हा नेकलेस किंमतीने किती मोठा आहे, याची कल्पना आपण करु शकतो.प्रियंका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत. 

टॅग्स :प्रियंका चोप्राअनंत अंबानीहोळी 2023