Join us  

प्रियंका चोप्राने नव-याच्या एक्स-गर्लफ्रेन्डसोबत मिळून बनवला प्लान!  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 3:19 PM

प्रियंका चोप्राने गतवर्षी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून प्रियंका कायम चर्चेत आहेत. अलीकडे प्रियंकाने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली. यादरम्यान पीसीने अनेक खुलासे केलेत. अगदी पती निक जोनासच्या एक्स-गर्लफ्रेन्डबद्दलही ती बोलली.

ठळक मुद्देनिक जोनास व माइली साइरस आधी एकमेकांच्या प्रेमात होते. अर्थात दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००७ मध्ये दोघांचेही ब्रेकअप झाले होते.

प्रियंका चोप्राने गतवर्षी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून प्रियंका कायम चर्चेत आहेत. अलीकडे प्रियंकाने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली. यादरम्यान पीसीने अनेक खुलासे केलेत. अगदी पती निक जोनासच्या एक्स-गर्लफ्रेन्डबद्दलही ती बोलली.शोमध्ये प्रियंकाला निकची एक्स-गर्लफ्रेन्ड माइली साइरसबद्दल  विचारण्यात आले. मग काय प्रियंकाने माइलीची अशी काही प्रशंसा सुरु केली की, तिला शब्दही कमी पडलेत. माइली खूप चांगली व्यक्ती आहे. तिच्या गाण्यांची मी फॅन आहे. माझ्या पतीची तब्येत खराब झाल्याचे ऐकून माइलीने त्याची मदत केली. ते मला फार आवडले. हे खरोखरच रोमॅन्टिक आहे, असे प्रियंका म्हणाली. प्रियंका इथेच थांबली नाही तर माइलीसोबत डबल डेटवर जाण्याचा प्लानही तिने सांगितला. 

मी आणि माइली आम्ही दोघींनी आपआपल्या पतींसोबत डबल डेटवर जाण्याचा प्लान बनवला होता. आम्ही अनेकदा भेटलो आणि डबल डेटचा प्लान बनवला, असे प्रियंका म्हणाली.

निक जोनास व माइली साइरस आधी एकमेकांच्या प्रेमात होते. अर्थात दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००७ मध्ये दोघांचेही ब्रेकअप झाले होते. यानंतर निक व माइली दोघेही आपआपल्या आयुष्यात पुढे गेलेत. निकने प्रियंकाशी लग्नगाठ बांधली तर माइलीनेही गतवर्षी डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलियन अभिनेता लियाम हेम्सवर्थसोबत लग्न केले.लग्नानंतर प्रियंका हॉलिवूड-बॉलिवूड दोन्हींमध्ये संतुलन राखण्याच्या प्रयत्नात दिसतेय. अलीकडे प्रियंकाचा ‘इजन्ट इट रोमॅन्टिक ’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला. याशिवाय ‘स्काय इज पिंक’ हा तिचा बॉलिवूडपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. प्रियंकाची ‘क्वांटिको’ हीअमेरिकन सीरिज प्रचंड गाजली होती. या शोने प्रियंकाला हॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख दिली.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास