Join us  

- अन् प्रियांका चोप्राला आठवले संजय लीला भन्साळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 7:31 PM

बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राच्या करिअरला ओहोटी लागल्याची चिन्हे आहेत. चर्चा खरी मानाल तर, सलमान खानसोबत ‘पंगा’ घेतल्यानंतर अनेक जण प्रियांकाला टाळू लागले आहेत. अशास्थितीत प्रियांकाला जुन्या हितचिंतकांची आठवण होणे स्वाभाविक आहे. 

बॉलिवूडमधील प्रियांका चोप्राच्या करिअरला ओहोटी लागल्याची चिन्हे आहेत. चर्चा खरी मानाल तर, सलमान खानसोबत ‘पंगा’ घेतल्यानंतर अनेक जण प्रियांकाला टाळू लागले आहेत. अशास्थितीत प्रियांकाला जुन्या हितचिंतकांची आठवण होणे स्वाभाविक आहे. ताज्या बातमीनुसार, करिअरच्या या टप्प्यावर प्रियांकाने निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना मदत मागितली आहे. विशेष म्हणजे, भन्साळींनीही प्रियांकासमोर मदतीचा हात पुढे केला आहे. भन्साळी हे प्रियांकाच्या जुन्या हितचिंतकांपैकी एक. त्यामुळेच प्रियांकासाठी त्यांनी आपला एक जुना प्रोजेक्ट नव्याने जिवंत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांकाला घेऊन ‘हीरा मंडी’ हा चित्रपट आणण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. 

या चित्रपटात १९५० व्या दशकातील मुंबईची एक कथा दाखवली   जाणार आहे. अद्याप याबद्दल घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भन्साळी नोव्हेंबरमध्ये या चित्रपटाची अधिकृत घोषणा करू शकतात. २०१७ च्या सुरूवातीला या चित्रपटाची चर्चा झाली होती. पण मग अचानक हा प्रोजेक्ट बंद पडला. होय, हा प्रोजेक्ट मागे ठेवून भन्साळींनी ‘पद्मावत’ करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत प्रियांकाही हॉलिवूडमध्ये व्यस्त झाली होती. या चित्रपटाची चार गाणी भन्साळींनी रेकॉर्ड केली आहेत. या चित्रपटात प्रियांका एका वारांगणेच्या भूमिकेत दिसेल.प्रियांकाने याआधी भन्साळींच्या ‘बाजीराव-मस्तानी’मध्ये काम केले आहे. या चित्रपटात तिने बाजीरावची पहिली पत्नी काशीबाईची भूमिका साकारली होती.तूर्तास प्रियांकाच्या करिअरवर बॉलिवूडच्या अनेकांची नजर आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रियांका बॉलिवूडपासून दूर आहे. सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटातून प्रियांकाचे कमबॅक होणार होते. पण प्रियांकाने ऐनवेळी हा चित्रपट सोडला. ‘भारत’नंतर तिने सोनाली बोसचा ‘द स्काय इज पिंक’ हा आॅफबीट चित्रपट साईन केला आहे. यात तिच्या अपोझिट फरहान अख्तर दिसणार आहे. फरहान अख्तरच्या करिअरबद्दल आपण सगळे जाणतोच. साहजिकचं कमबॅकसाठी प्रियांकाने फरहानचा चित्रपट निवडावा, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रासंजय लीला भन्साळीसलमान खान