Join us

बॉलिवूड दिग्दर्शकाने दिला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला, प्रियंका चोप्राचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 07:00 IST

सध्या प्रियंकाची एक मुलाखत चर्चेत आहे. यात तिने सांगितले की, एका दिग्दर्शकाने तिला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला कसा दिला.

प्रियांका चोप्रा 9 फेब्रुवारीला (काल) 'अनफिनिश्ड' या  आत्मचरित्रचे प्रकाशन केले.  यापूर्वी तिने आपल्या इन्स्टाग्रामवर टीझर ऑडिओ बुकच्या स्वरुपात रिलीज केले आहे. तिचे फार कौतुक होतेय. सध्या प्रियंकाची एक मुलाखत चर्चेत आहे. यात तिने सांगितले की, एका दिग्दर्शकाने तिला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला कसा दिला.

दिग्दर्शकाचे म्हणणे ऐकून सिनेमा सोडला होताmetro.co.uk दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चोप्रा म्हणाली की, 2000 मध्ये मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये करण्याची तयारी केली होती. सुरुवातीला मिळालेल्या एका सिनेमाच्या ऑफरमध्ये दिग्दर्शक असे काही बोलला जे ऐकून तिने हा सिनेमा सोडून दिला. 

ती म्हणते, ही माझ्या करिअरची सुरुवात होती पण मी हा सिनेमा मी का सोडला हे मी कधीही सांगितले नाही. प्रियंकाने सांगितले की, दिग्दर्शकाने तिला ब्रेस्ट वाढवण्यासाठी सर्जरी करण्यास सांगितले. प्रियंका म्हणाली त्यावेळी तिच्या मॅनेजरनेसुद्धा यावर सहमती दर्शविली होती. 

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘टेक्स्ट फॉर यू’ हा हॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटींग तिने संपवले. याआधी ती ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूडपटात दिसली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा