Join us

सुंदर दिसण्याच्या नादात अशा विचित्र ड्रेसमध्ये बघावयास मिळाली प्रियंका चोपडा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 19:27 IST

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या ‘क्वांटिको’च्या सीजन-३ ची शूटिंग करीत आहे. तसेच ती लवकरच तिच्या दुसºया ‘अ किड लाइक ...

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या ‘क्वांटिको’च्या सीजन-३ ची शूटिंग करीत आहे. तसेच ती लवकरच तिच्या दुसºया ‘अ किड लाइक जॅक’ या हॉलिवूडपटात झळकणार आहे. नुकतीच प्रियंका तिच्या या चित्रपटाच्या प्री-स्क्रिनिंगसाठी उटाह येथील सनडेन्स फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. मात्र या ठिकाणी ती खूपच विचित्र अंदाजात बघावयास मिळाली. प्रियंकाने काळ्या रंगाच्या स्वेटरवर मॅचिंग बूट घातले होते. याव्यतिरिक्त तिने शायनी ब्राउन लिपस्टिक आणि हवी आयमेकअप केला होता. ज्यामुळे तिला लूक पूर्णपणे बदलला होता. वास्तविक प्रियंकाने या अगोदरही सुंदर दिसण्याच्या नादात आपल्या लूकवर असेच प्रयोग केले आहेत. मे २०१७ मध्ये मेट गालामध्ये प्रियंका राल्फ रॉलेनच्या ड्रेसमध्ये बघावयास मिळाली होती. तिचा हा ड्रेस खूपच महाकाय असल्याने सोशल मीडियावर यावरून तिची चांगलीच खिल्ली उडविण्यात आली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये प्रियंका ग्लोबल सिटीजन फेस्टिव्हलमध्ये होस्ट म्हणून पोहोचली होती. मात्र ती या फेस्टिव्हलमध्ये वियर्ड फ्लोरल ड्रेसमुळे चांगलीच चर्चेत राहिली. प्रियंकाने या शोमध्ये लाल रंगाच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फ्लोरलवाला मिनी शिफ्ट ड्रेस परिधान केला होता. यावर तिने मॅचिंग हाय बूट्स घातले होते. या ड्रेसमध्ये ती खूपच विचित्र दिसत होती. २०१३ मध्ये एमटीव्ही व्हिडीओ अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवरही प्रियंकाचा असाच काहीसा विचित्र अंदाज बघावयास मिळाला. प्रियंकाचा हा ड्रेस एखाद्या वर्तमानपत्रासारखा दिसत होता. एवढेच काय तर तिच्या ड्रेसवरील काही रंग रेड कार्पेटला मॅच होत होते. २००९ मध्ये व्हाट्स योर राशिच्या प्रीमियरमध्ये प्रियंका अशाच काहीशा विचित्र अंदाजात बघावयास मिळाली होती. कारण तिने परिधान केलेल्या साडीचा रंग तिला सूट होत नव्हताच शिवाय, तिने ती साडी अतिशय विचित्र अंदाजात परिधान केली होती. २००९ मध्ये मुंबई पोलिसांतर्फे आयोजित केलेल्या ‘उमंग’ सोहळ्यातही प्रियंका विचित्र ड्रेस परिधान करून पोहोचली होती. शॉर्ट स्कर्टवर घातलेला टॉप आणि त्यावर घातलेल्या ब्राउन बेल्टमध्ये ती खूपच विचित्र दिसत होती. लहान-मोठ्या इव्हेंटमध्ये नटून-थटून जाणारी प्रियंका २०१० मध्ये वेबसाइट लॉन्चच्या कार्यक्रमात मात्र विचित्र ड्रेसमध्ये दिसली. अतिशय कॅज्युअल ड्रेसमध्ये पोहोचलेल्या प्रियंकाचा लूक बघून अनेकांना आश्चर्य वाटले नसेल तरच नवल. २०११ मध्ये आलेल्या ‘सात खून माफ’ या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये प्रियंका आॅरेंज ड्रेस परिधान करून आली होती. मात्र या ड्रेसवर तिने घातलेली गोल्डन सॅण्डल खूपच विचित्र दिसत होती.