Join us  

देसी गर्ल अन अफताब शिवदासनीसह 'हा' मराठमोळा अभिनेताही लंडनमध्ये अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 1:01 PM

भारतासह इतर ४० देशांमध्ये ब्रिटनमधून येत असलेली विमानं रोखण्यात आली आहेत.

काेविड १९ विषाणूचा अधिक वेगाने पसरणारा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. नवा विषाणू ब्रिटनशिवाय इतरही देशांमध्ये आढळला आहे. ज्यामुळे भारतासह इतर ४० देशांमध्ये ब्रिटनमधून येत असलेली विमानं रोखण्यात आली आहेत. परिणामी लंडनमध्ये  अनेकजण अडकले आहेत. यात बॉलिवूड कलाकार प्रियंका चोप्रा, आफताब शिवदासानीसह मराठी अभिनेता संतोष जुवेकर ही अडकल्याची माहिती आहे.

एका न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, संतोष जुवेकर, प्रियंका आणि आफताब यांना आगामी काळात लंडनमध्येच थांबवं लागणार आहे. रिपोर्ट्सनुसार प्रियंका चोप्रा  हॉलिवूड रोमँटिक सिनेमा 'टेक्स्ट फॉर यू'साठी शूट करत होती. 29 नोव्हेंबरपासून शूटिंग सुरु होते. या सिनेमाचे शेड्यूल जानेवारीपर्यंत होते. आता असे सांगितले जात आहे की प्रॉडक्शन टीम तातडीने अमेरिका सोडण्याची तयारीत आहे. संतोष जुवेकर 'थ्री चिअर्स टू' सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये गेला होता. या सिनेमाच्या शूटिंगसाठी  सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढामेसुद्धा लंडनमध्ये गेले होते, मात्र ते काही दिवसांपूर्वीच भारतात परतले आहेत. संतोष मात्र तिकडे अडकून पडला. 

रिपोर्टनुसार, प्रवासी निर्बंधानंतर खास परवानगी घेऊन परत जाण्याची तयारी सुरू आहे. तथापि, लॉकडाऊनचे नियम कठोर केल्यामुळे या प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकेल. यामुळे प्रियंका आणि दुसऱ्या टीमना काहीकाळ लंडनमध्ये राहायला लागू शकते. 

आफताब आपल्या पत्नी आणि मुलीसोबत याच महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये गेला होता. कुटुंबासमवेत सुट्टी घालवल्यानंतर तो आपल्या होम प्रॉडक्शनच्या कामासाठी भारतात परत येणार होता.

 

टॅग्स :प्रियंका चोप्रासंतोष जुवेकरआफताब शिवदासानी