Join us  

निकसोबत लग्न केल्यानंतर नेमकं काय बदललं? वाचा, प्रियंका चोप्राचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 10:28 AM

लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदललं, तसं या 3 वर्षांत प्रियंकाचंही आयुष्य थोड्या फार प्रमाणात बदललं आहे...

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) 2018 साली अमेरिकन पॉप सिंगर निक जोनाससोबत (Nick Jonas) लग्नबेडीत अडकली. लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदललं, तसं या 3 वर्षांत प्रियंकाचंही आयुष्य थोड्या फार प्रमाणात बदललं आहे. पण नेमकं काय बदललं? एका ताज्या मुलाखतीत प्रियंकाने याचाच खुलासा केला आहे.‘टाइम्स लिटरेरी फेस्ट’दरम्यान प्रियंकाने लग्नाबद्दल आणि लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केलेत.

लग्नापासून काय शिकलीस? या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, एक गोष्ट जी लग्नानंतर मला समजलीये, ती म्हणजे माझ्या पार्टनरने माझ्या कामाला दिलेलं महत्त्व. मला एका चीअरलीडरची गरज होती आणि माझ्या पार्टनरच्या रूपात तो मला मिळालाये. निक त्याच्या करिअरसोबतच माझ्या करिअरलाही तितकंच महत्त्व देतो. मला कुठं जायचंय, काय आवडतं, या गोष्टींची काळीजी घेतो. मी वयाच्या 17 व्या वर्षी कामाला सुरूवात केली. तेव्हापासून आजपर्यंत माझं कुटुंब अगदी पहाडासारखं खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं आहे. माझ्या या कष्टाचं मोल करणाºया पार्टनरची मला गरज होती. मी माझं करिअर बनवण्यासाठी प्रचंड मेहनत केली. याचं कौतुक करणारा एक पार्टनर मला हवा होता आणि निकच्या रूपात तो मला मिळाला आहे. हे माझं नशीब आहे.

निकसोबतच्या लग्नाचा तुझ्या कामावर काय परिणाम झाला? असं विचारलं असता ती म्हणाली, निकने मला विशेष प्रभावित केले. आता मी खासगी आयुष्यात आणखी शांत झालेय. आधी मला लवकरच राग यायचा. पण आता मी ब-यापैकी रागावर नियंत्रण मिळवलं आहे. निक खूप शांत स्वभावाचा आहे. त्याच्याकडे प्रत्येक समस्येचा तोडगा असतो. तो डिप्लोमेट आहे आणि मी तिखट मिरची.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास