Join us  

थांबता थांबेना प्रियंकांच्या डिपनेक गाऊनची चर्चा! आई म्हणाली, ते तिचं शरीर;  प्रियंका म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 11:50 AM

म्हणून ती झाली नाही वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार...

ठळक मुद्देआईनंतर आता प्रियंकानेही ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या गॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये देसी गर्ल प्रियंका चोप्राने पती निक जोनासोबत हजेरी लावली आणि प्रियंकाचा बोल्ड अवतार पाहून सगळेच थक्क झालेत. तिने घातलेला डीपनेक गाऊन पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. मग काय, प्रियंका ट्रोल झाली. राल्फ अ‍ॅण्ड रुसोने डिझाईन केलेल्या या ड्रेसमुळे लोकांनी तिला नाही नाही ते ऐकवले. इतके की, ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी प्रियंकाची आई मधू चोप्रा मैदानात उतरली.

‘ते तिचे शरीर आहे. तिला सुंदर शरीराची देणगी मिळाली आहे. या शरीरासोबत ती काहीही करू शकते. प्रियंकाला ट्रोल करणारे सगळे पडद्यामागे बसणारी लोक आहे. त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात करण्यासारखे काहीही नाही. अशा ट्रोलर्स मी किंवा प्रियंका दोघेही भाव देत नाही,’ अशा शब्दांत मधू चोप्रा यांनी ट्रोलर्सला सणसणीत उत्तर दिले.

आईनंतर आता प्रियंकानेही ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले आहे. ‘ मला कम्फर्टेबल वाटतील, अशाच पद्धतीने माझे कपडे तयार होतात. ग्रॅमी अवार्डमधील माझा ड्रेसही असाच कम्फर्टेबल ड्रेस होता. या ड्रेसमध्ये एक पारदर्शक जाळीसारखं कापड लावण्यात आले होते. त्यामुळे समोरुन तो डीपनेक वाटत असला तरी माझ्यासाठी कम्फर्टेबल होता. कोणत्याही पुरस्कार सोहळ्यामध्ये मी फॅशनमुळे अडचणीत येणार नाही याची पुरेपूर काळजी घेत असते. एखाद्या ड्रेसमध्ये कंफर्टेबल असते तेव्हाच घरातून बाहेर पडते. मला लोक काय म्हणतील, याची जराही पर्वा नाही. मी काय घातले, का घातले, असे प्रश्न मला मुळीच पडत नाहीत,’ असे ती म्हणाली. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा