Join us  

प्रियंका चोप्राने निक जोनासला किस केल्यानंतर असं काही केलं की, सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 1:18 PM

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील प्रियंका-निकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्देप्रियंकाने हळूवार निकच्या ओठावर किस केले. पण किस करताना तिची लिपस्टिक मात्र निकच्या ओठाला लागली. त्यावर तिने लगेचच हाताने ती पुसली. प्रियंका आणि निकचा हा क्यूट व्हिडिओ सध्या त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. 

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला हॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. प्रियंका चोप्रा देखील पती निक जोनाससोबत या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. तिने गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता तर निक ब्लँक रंगाच्या टक्सेडो सूटमध्ये दिसला. त्या दोघांचा लूक त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर असणाऱ्या अँकरनी प्रियंका आणि निकला पाहाताच थांबवले आणि एकमेकांना तुम्ही किस करा असे ते दोन अँकर प्रियंका आणि निकला आग्रह करू लागले. सुरुवातीला प्रियंका या गोष्टीसाठी तयार नव्हती. पण नंतर तिने हळूवार निकच्या ओठावर किस केले. पण किस करताना तिची लिपस्टिक मात्र निकच्या ओठाला लागली. त्यावर तिने लगेचच हाताने ती पुसली. प्रियंका आणि निकचा हा क्यूट व्हिडिओ सध्या त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांनी गेल्या वर्षी धुमधडाक्यात लग्न केले. जोधपूरच्या उमेद भवन येथे १ आणि २ डिसेंबरला हा रॉयल विवाह सोहळा पार पडला होता. हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने त्या दोघांनी लग्न केले. प्रियंका आणि निकचे लग्न 2018 मधील सर्वाधिक चर्चित लग्न होते. म्हणूनच या दोघांच्या संगीत सेरेमनीवर आता एक वेबसीरिज बनतेय. ही सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज केली जाणार आहे. 

एक सेलिब्रिटी आपल्या लग्नाचे खासगी क्षण सीरिजरूपात प्रेक्षकांसमोर घेऊन येण्याची ही पहिली वेळ असेल. 2020 मध्ये ही सीरिज रिलीज होणार आहे. खुद्द प्रियंकाने अलीकडे ही माहिती जाहीर केली होती. ‘आमच्या लग्नाच्या संगीत सेरेमनीमध्ये दोन्ही कुटुंबांनी परफॉर्म केला होता. त्यातून आमची प्रेम कथा दर्शवण्यात आली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास