Join us  

"मला बर्‍याच सिनेमांमधून काढून टाकले गेले.." नेपोटिझम वादावर प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 5:30 PM

प्रियंका तिच्या बॉलिवूडमधील प्रवासात नेपोटिझमचा सामना केला आहे.

सुशांत सिंग राजपूत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते. तेव्हापासून हा विषय चर्चेचा बनला आहे. सगळे स्टार यावर आपली मतं मांडत आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्राने देखील यावर आपलं मत व्यक्त केले आहे. जर तुमच्यात प्रतिभा असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रियंका म्हणते, इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक प्रकाराचा नेपोटिझम आहे आणि मला असे नाही वाटत की तुम्ही जर तुमचा जन्म फिल्मी कुटुंबात झाला तर काही चुक आहे. प्रियंका तिच्या बॉलिवूडमधील प्रवासात नेपोटिझमचा सामना केला आहे. मला बर्‍याच वेळा सिनेमांमधून काढून टाकले गेले आहे कारण त्यांच्याकडे दुसर्‍या नावाची शिफारस केली जायची. मला हरायची भीती नव्हती. गोष्टी मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली स्वत:ला ट्रेन केले. आयुष्यात माझे गोल सेट केले. मला माहित आहे की जगात कोणतीही गोष्ट फिकट मिळत नाही.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती द स्काय इज पिंक चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत झायरा वसीम व फरहान अख्तर मुख्य भूमिकेत होते.हा चित्रपट समीक्षकांना खूप भावला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.

टॅग्स :प्रियंका चोप्रा