Join us  

नव्या सिनेमाची घोषणा करताना प्रियांकाने दीपिकाच्या बाबतीत केली मोठी चूक, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 10:55 AM

प्रियांकाने नुकतंच तिच्या ओटीटीवरील नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. पण, ही घोषणा करताना प्रियांकाने दीपिकाबाबत एक मोठी चूक केली.

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. प्रियांका आणि दीपिकाने अभिनय आणि कठीण परिश्रमाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. प्रियांकाने नुकतंच तिच्या ओटीटीवरील नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रियांकाने तिच्या आगामी 'टायगर' या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. पण, ही घोषणा करताना प्रियांकाने दीपिकाबाबत एक मोठी चूक केली. 

डिस्ने प्लस हॉटस्टारचा 'टायगर' हा सिनेमा भारतातील जंगल आणि वाघ यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमातील अंबा या नावाच्या वाघीणीला प्रियांकाने आवाज दिला आहे. याबाबतही तिने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये माहिती दिली आहे. पण, सिनेमाबाबत घोषणा करताना प्रियांकाने एक मोठी चूक केली. या पोस्टमध्ये प्रियांकाने चुकून दीपिका पादुकोणला टॅग केलं होतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या सिनेमात दीपिकाही आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. 

प्रियांकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या. "दीपिका पण या प्रोजेक्टमध्ये आहे का?", "दीपिकाला का टॅग केलं आहे?", "यात दीपिका पण आहे का? प्रियांकाने तिला टॅग केलं आहे" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. त्यानंतर मात्र प्रियांकाने कॅप्शन एडिट करत तिची चूक सुधारली आहे. 

प्रियांकाचा हा 'टायगर' सिनेमा येत्या २२ एप्रिलला पृथ्वी दिवस या दिवशी प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा गेल्या ८ वर्षांपासून चित्रित केला जात आहे. भारतातील जंगलात अनेक छोटे, मोठे, साहसी आणि डरपोक प्राणी राहत असतात. यांच्यातच अंबा नावाची एक वाघीण तिच्या बछड्यांचं संगोपण करत आहे. आई आणि मुलामधील या नात्याची आणि अंबाच्या फॅमिलीची गोष्ट यातून उलडगण्यात येणार आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रादीपिका पादुकोण