Join us  

लोक मला ‘प्लास्टिक चोप्रा’ म्हणू लागले होते...! वाचा प्रियंका चोप्राच्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकातील शॉकिंग किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 5:25 PM

Unfinished : बूब जॉबपासून पीएम मोदींसोबतच्या त्या वादग्रस्त फोटोंपर्यंत, प्रियंका लिहिते ...

ठळक मुद्दे2017 साली प्रियंकाने पीएम मोदी यांची भेट घेतली होती. त्याचा फोटो शेअर करताच प्रियंका जबरदस्त ट्रोल झाली होती.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता केवळ अभिनेत्री, निर्माती राहलेली नाही. लेखिका ही तिची नवी ओळख आहे.  नुकतेच तिचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रकाशित झालेय. प्रियंकाचे हे पुस्तक सध्या जाम चर्चेत आहेत. या पुस्तकात प्रियंकाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. अगदी बूब जॉबपासून तर पीएम मोदी यांच्यासोबतच्या फोटोमुळे ट्रोल होण्यापर्यंतच्या तिने खुलासे केले आहेत. तेव्हा .  प्लास्टिक सर्जरी आणि त्या घटनेचा उल्लेखही तिने या पुस्तकात केला आहे.

लोक म्हणू लागले होते प्लास्टिक चोप्रा...

पुस्तकात प्रियंका चोप्राने तिच्या नोज सर्जरी अर्थात नाकाच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल लिहिले आहे. ती लिहिते, मी डॉक्टरजवळ गेले होते. माझ्या कुटुंबातील लोकांनी या डॉक्टरचे नाव सुचवले होते. डॉक्टरांनी माझ्या नाकाच्या नोजल कॅव्हिटीमध्ये पॉलिप असल्याचे सांगितले. ते हटवणे गरजेचे होते आणि हे सर्जरीनेच शक्य होते. तशी ही एक रूटीन प्रोसेस आहे. पण माझ्याबाबतीत असे झाले नाही. पॉलिपसाठी सर्जरी करणाºया डॉक्टरांकडून चुकून माझ्या नाकाची ब्राईड सरकली. यामुळे नाकाचा ब्रिज डॅमेज झाला. पट्टी हटली आणि मी माझ्या नाकाची स्थिती बघितली तेव्हा मी आणि माझी आई दोघीही घाबरून गेलो होता. माझे खरे नाक पूर्णपणे बदलले होते. माझा चेहरा पूर्णपणे बदलला होता. मी इतकी निराश झाले होते की, जेव्हाही आरसा बघायचे तेव्हा लोक माझ्यावर हसत असल्याचे मल वाटायचे. माझा आत्मविश्वास संपला होता. आता सगळे संपले असे मला वाटू लागले होते. सगळ्यात जास्त त्रास झाला तो याचा की माझ्या नाकाची सर्जरी पब्लिक अफेअर बनली होती. लोक मला प्लास्टि चोप्रा म्हणून बोलवू लागले होते. वृत्तपत्रात याच नावाने बातम्याही येत होत्या. ज्या नावाने संपूर्ण प्रोफेशनल लाईफमध्ये माझा पिच्छा केला....

मोदींसोबतच्या त्या फोटोवरही बोलली...

2017 साली प्रियंकाने पीएम मोदी यांची भेट घेतली होती. त्याचा फोटो शेअर करताच प्रियंका जबरदस्त ट्रोल झाली होती. यावर ती लिहिते, ‘पंतप्रधान मोदीजी व मी योगायोगाने एकाच हॉटेलात थांबलो होता. मी त्यांच्या आॅफिसात कॉल केला आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्या बेवॉच या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये मी जो ड्रेस घातला होता, तोच घालून मी मोदींना भेटायला गेले. पण या ड्रेसमुळे मी ट्रोल झाले. पण माझ्या मते, मी काहीही चूक केली नव्हती. मी अतिशय सभ्य होते...’

सलमानने केली होती मदत...

एका सिडक्टिव्ह गाण्यात प्रियंकाला एक-एक करून कपडे काढायचे होते. हा सीन खूप मोठा होता आणि प्रियंकाला अंगप्रदर्शन करायचे नव्हते. त्यामुळे मी एक एक्स्ट्रा बॉडी लेअर घालू का? असे तिने या दिग्दर्शकाला विचारले. यावर दिग्दर्शक जे काही बोलला ते प्रियंकासाठी शॉकिंग होते. ती याबद्दल लिहिते, ‘ त्यावेळी दिग्दर्शकाने मला मला माझ्या डिझायनरशी बोलायला सांगितले. मी त्यांना फोनवर सर्व परिस्थिती सांगितली आणि दिग्दर्शकाला फोन दिला. माझ्या शेजारी उभे राहत तो दिग्दर्शक माझ्या डिझाईनरशी बोलला.  काहीही होऊदे अंतर्वस्त्र दिसली पाहिजेत. नाहीतर मग प्रेक्षक चित्रपट पाहायला का येतील? असे तो म्हणाला.  ही माझ्यासाठी खूपच धक्कादायक गोष्ट होती. मी यासाठी आजिबात तयार नव्हते. त्यानंतर मी तो चित्रपट सोडून दिला. मी त्या गाण्यासाठी मानसिकरित्या तयार होते. पण तो दिग्दर्शक माझ्याबद्दल जे काही बोलला, ते मला आवडले नव्हते.   हा चित्रपट सोडल्यानंतर तो दिग्दर्शक रागारागात माझ्या दुसºया चित्रपटाच्या सेटवर पोहोचला.  या प्रकरणात माझा को-स्टार सलमान खान याने वेळीच मध्यस्ती केली. सलमान त्या दिग्दर्शकाला काय बोलला माहित नाही. पण त्यानंतर त्या दिग्दर्शकाचा माझ्यासोबत बोलण्याचा टोनच बदलला... 

टॅग्स :प्रियंका चोप्रा