Join us

बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्रा करू शकते कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 11:45 IST

प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतली आहे. त्यामुळे तिच्या बॉलिवूडमध्ये परतण्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार प्रियांका ...

प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतली आहे. त्यामुळे तिच्या बॉलिवूडमध्ये परतण्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार प्रियांका मुंबईत आल्यापासून अनेक दिग्दर्शकांना भेटते आहे तिच्या पुढच्या चित्रपटांच्या संदर्भात.  रिपोर्टमध्ये हे ही लिहिण्यात आले आहे की प्रियांका लवकरच दिग्दर्शक शोनाली बोसच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटासंदर्भात तिने शोनालीची भेटसुद्धा घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची निर्मिती रोनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ मल्होत्रा करणार आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट प्रियांकाला खूपच आवडली आहे. शोनालीने या चित्रपटाला घेऊन काम सुरु केले आहे. आता या चित्रपटातल्या हिरोचा शोध सुरु आहे.  चित्रपटाची कथा खऱ्या आयुष्यावरुन प्रेरणा घेऊऩ तयार करण्यात आली आहे.   मीडिया रिपोर्टनुसार अली अब्बास जाफर दिग्दर्शित 'भारत' चित्रपटात सलमान खानच्या अपोझिट प्रियांकाला चोप्राला साईन करायची तयार सुरु आहे. जर प्रियांका चोप्रा या चित्रपटाचा भाग बनली तर दोन दशकानंतर सलमान आणि प्रियांकाची जोडी पुन्हा एकदा रसिकांना दिसणार आहे. याआधी 2008मध्ये 'गॉड तुसी ग्रेट हो'मध्ये एकत्र दिसले होते.  रसिकांना दोघांची केमिस्ट्री 'मुझसे शादी करोगे' या चित्रपटात देखील आवडली होती. प्रियांकाने याआधी अली अब्बास जफरसोबत 'गुंडे' चित्रपटात काम केले आहे. रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वी या  चित्रपटासंदर्भात न्यूयॉर्कमध्ये अली अब्बासने प्रियांकाची भेट घेतली आहे. भारतची शूटिंग या वर्षाच्या मिडपर्यंत सुरू होऊ शकते. सध्या अली लंडनमध्ये चित्रपटाच्या लोकेशनसाठी फिरतो हे.अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय.प्रियांका नुकतेच अमेरिकन टीव्ही सिरीज 'क्वांटिको'चे शूटिंग संपवून भारतात परतली आहे. सोशल मीडियावर प्रियांकाने प्रियांकाने एक फोटो शेअर केला आहे ज्यात 6 स्क्रिप्टस दिसतायेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका बॉलिवूडपासून लांब आहे. मधल्या काळात ती हॉलिवूड प्रोजेक्टसमध्ये बिझी होती. त्यामुळे हिंदी चित्रपट करायला तिच्याकडे वेळ नव्हता.