Join us  

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे पहिले रिसेप्शन होणार 'या' शहरात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 11:24 AM

बॉलिवूडची देसी गर्लने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला आहे. प्रियांकाच्या लग्नात उद्योगपती मुकेश अंबानींचे कुटुंबीय हि हजर होते.

ठळक मुद्दे लग्नासाठी 40 फुटांचा मंडप उभारण्यात आला होता प्रियांकाच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन दिल्लीत होणार आहे तर दुसरे रिसेप्शन मुंबईत होणार आहे

बॉलिवूडची देसी गर्लने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह केला आहे. प्रियांकाच्या लग्नात उद्योगपती मुकेश अंबानींचे कुटुंबीय हि हजर होते. लग्नासाठी 40 फुटांचा मंडप उभारण्यात आला होता. लग्नानंतर दोघे दिल्लीला रवाना झाले आहेत. 4 डिसेंबरला  प्रियांकाच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन दिल्लीत होणार आहे तर दुसरे रिसेप्शन मुंबईत होणार आहे.

    प्रियांकाच्या संगीत सेरेमनीपासून लग्न सगळे काही चर्चेत राहिले. संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या गाण्यांवर इंडोवेस्टर्न स्टाईलमध्ये संगीत सोहळयाचे आयोजन केले होते.

यावेळी विविध जुन्या-नव्या अशा धमाकेदार गाणी सादर झाली तसेच उपस्थित पाहुणेमंडळी आणि नातेवाईकांनी या सोहळयाचा साक्षीदार बनत यथेच्छ आनंद लुटला. 

अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली.

यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देणार आहेत.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास