Join us  

इटलीमध्ये प्रियंका आणि निक करतायेत व्हॅकेशन एन्जॉय, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 12:49 PM

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस इंडस्ट्रीतले रोमाँटीक कपल पैकी एक आहेत. दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

ठळक मुद्देनिक जोनसने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस इंडस्ट्रीतले रोमाँटीक कपल पैकी एक आहेत. दोघे नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून दोघे क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहेत. दोघे इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत.  

निक जोनसने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत निक आणि प्रियंका एक रोमाँटिक डान्स करताना दिसतायेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होतो आहे. काही दिवसांपूर्वी निकच्या भाऊ जो जोनस लग्न फ्रान्समध्ये झाले होते. दीराच्या लग्नात प्रियंका ट्रेडिशनल अंदाजात दिसली.

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर प्रियंकाचा ‘स्काय इज पिंक’ बॉलिवूड सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘स्काय इज पिंक’ या चित्रपटात प्रियंका चोप्रा फरहान अख्तरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा आयशाच्या आई- वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. द स्काय इज पिंक' सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. या सिनेमाची कथा १३ वर्षीय आयशा चौधरीभोवती फिरते. या वयात तिला पल्मनरी फाइब्रोसिस हा आजार होतो. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनते. त्यानंतर ती कधीच हार मानत नाही. वयाच्या १८व्या वर्षी तिचे निधन होते. या सिनेमाचे शूटिंग मुंबई, लंडन व अंदमानमध्ये करण्यात आले आहे. प्रियंकाचे फॅन्स या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही. 'द स्काय इज पिंक' सिनेमा ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस होणार आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास