Join us  

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसला प्रियांका चोप्रा व निक जोनासचा रोमॅन्टिक अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 10:03 AM

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या सेलिब्रिटी कपलचे तिसरे रिसेप्शन काल रात्री मुंबईत पार पडले. यंदाचे सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी कपल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. गत रात्री निकयांकाने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले.

ठळक मुद्देया ग्रॅण्ड पार्टीत प्रियांकाने पिस्ता रंगाचा लहंगा घातला होता तर निक हिरव्या सूटमध्ये होता. निकयांका या रिसेप्शनमध्ये मीडियासमोर रोमॅन्टिक होताना दिसले.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या सेलिब्रिटी कपलचे तिसरे रिसेप्शन काल रात्री मुंबईत पार पडले. यंदाचे सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी कपल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. गत रात्री निकयांकाने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या तमाम सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अगदी सलमान खानपासून प्रियांकाचा एक्स-बॉयफ्रेन्ड हर्मन बावेजा, संजय लीला भन्साळी, आशा भोसले, रेखा, दीपिका पादुकोण व रणवीर सिंग, हेमा मालिनी, कंगना राणौत, काजोल असे सर्व या रिसेप्शनमध्ये सहभागी झालेत.

या ग्रॅण्ड पार्टीत प्रियांकाने पिस्ता रंगाचा लहंगा घातला होता तर निक हिरव्या सूटमध्ये होता. निकयांका या रिसेप्शनमध्ये मीडियासमोर रोमॅन्टिक होताना दिसले. मीडियासोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. सर्वांचे आभार मानले.

यानंतर रिसेप्शन सुरु झाले. रात्री उशीरापर्यंत ते चालले. या रिसेप्शनमध्ये प्रियांका व निकने धम्माल डान्स केला. प्रियाांक व दीपिका या दोघींनी ‘पिंगा’ गाण्यावर ताल धरला. एकंदरचं प्रियांकाचे हे रिसेप्शन लग्नाप्रमाणेच यादगार ठरले.

परवा मुंबईतच प्रियांका व निकचे दुसरे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शपमध्ये केवळ कुटुंबाचे सदस्य आणि खास पाहुण्यांना निमंत्रित केले गेले होते. त्याआधी दोघांनीही दिल्लीत एक रिसेप्शन दिले होते.जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले.

प्राप्त माहितीनुसार, प्रियांका व निक येत्या २८ डिसेंबरला हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला रवाना होतील. १० जानेवारीला ते परततील.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास