Join us  

प्रियंका चोप्रा अन् निक जोनसच्या गृहप्रवेशाची पोलखोल, क्वारंटाईनमधील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 10:35 AM

प्रियंका सध्या तिच्या 'अनफिनिश्ड' या आत्मचरित्राला घेऊन चर्चेत आहे.

ग्लोबल ऑयकॉन प्रियंका चोप्रा बॉलिवूडनंतर सध्या हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखवते आहे. प्रियंका सध्या तिच्या 'अनफिनिश्ड' या आत्मचरित्राला घेऊन चर्चेत आहे. 'अनफिनिश्ड'मध्ये तिने तिच्या प्रवासाबद्दल लिहिले आहे. यात तिने चांगल्या आणि वाईट गोष्टींचा उल्लेख केला आहे. या आत्मचरित्रातील काही पानं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. ज्याची पानं प्रियंकाने स्वत: देखील शेअर केली आहेत. यापैकी एका फोटोमध्ये प्रियंका आपल्या नव्या घरात गृहप्रवेश करताना दिसतेय. 

प्रियंका चोप्राचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय, ज्यात ती नव्या घरात प्रवेश करताना दिसतेय. फोटोत तिच्यासोबत पती निक जोनाससुद्धा दिसतेय. या फोटोच्या खाली लिहिले आहे, क्वारांटाईनच्या दरम्यान नव्या घरात गृहप्रवेश करणं  आमच्यासाठी खूप असमान्य होते. मात्र आम्ही याला गृहप्रवेश सेरेमनीसोबत बेस्ट बनवले. फोटो अभिनेत्रीच्या 'अनफिनिश्ड' या पुस्तकातून लीक झाले आहेत. 

प्रियंकाने सांगितले की पुस्तकातून तिच्या लग्नाचे फोटोही लीक झाले आहेत. अभिनेत्रीने आपल्या पुस्तकाची काही पानं शेअर करताना लिहिले, 'नो स्पोइलर्स प्लीज.' प्रियंकांच्या या टि्वटवर लोक खूप कमेंट करतायेत. नव्या घरात गृहप्रवेश करताना प्रियंका कुर्ता घातलेला दिसतोय. डोक्यावर ओढणी घेतलेली आणि कलश घेतलेला दिसतोय.  

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास