Join us  

असा होता दिल्लीत रंगलेल्या रिसेप्शनमध्ये प्रियांका व निकचा थाट, पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 10:36 PM

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. यानंतर आज ४ डिसेंबरला दिल्लीत दोघांचेही रॉयल रिसेप्शन रंगले.

ठळक मुद्देव्हाईट रंगाच्या लहंगा, त्याला साजेशी ज्वेलरी,केसात माळलेली पांढ-या गुलाबाची फुले अशी जणू एखादी राजकन्या भासावी असा प्रियांकाचा थाट होता. नेव्ही ब्ल्यू रंगाचा कोट घातलेला निक जोनास हाही कुण्या राजकुमारापेक्षा कमी भासत नव्हता.

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. यानंतर आज ४ डिसेंबरला दिल्लीत दोघांचेही रॉयल रिसेप्शन रंगले. दिल्लीतील या रिसेप्शनचे फोटो समोर आले आहेत आणि या फोटोतील प्रियांका व निकचा थाट दृष्ट लागावी असा आहे. व्हाईट रंगाच्या लहंगा, त्याला साजेशी ज्वेलरी,केसात माळलेली पांढ-या गुलाबाची फुले अशी जणू एखादी राजकन्या भासावी असा प्रियांकाचा थाट होता. नेव्ही ब्ल्यू रंगाचा कोट घातलेला निक जोनास हाही कुण्या राजकुमारापेक्षा कमी भासत नव्हता.

प्रियांका व निकचे अख्खे कुटुंब व नातेवाईक आणि मित्रमंडळी या रिसेप्शनला हजर होते. गत १ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात प्रियांका व निक यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला.यानंतर २ डिसेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. यादरम्यान प्रियांकाला घ्यायला निक अगदी घोडीवरून वाजतगाजत आला.

उमेद भवनात शाही वरात निघाली़ यानंतर हिंदू मंत्रोच्चारात दोघांचाही विवाह पडला. हा विवाह सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा होता. लग्नाचे रिसेप्शनही अगदी असेच डोळ्यांची पारणे फेडणारे होते, हे सांगणे नकोच. प्रियांका व निकच्या लग्नाचे फोटो लीक होऊ नये म्हणून सुरक्षेचा खास बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ड्रोनने कुणी फोटो घेऊ नये यासाठी खास इस्राईलवरून १२ शूटर्स बोलवण्यात आले होते. तथापि आज रिसेप्शनला काही तास असताना प्रियांका व निकच्या लग्नाचे अधिकृत फोटोही जारी करण्यात आले.

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास